Whom will MP Narayan Rane elect as Chairman of Sawantwadi Panchayat Samiti 
कोकण

 खासदार नारायण राणे सावंतवाडी पंचायत समिती  सभापतीपदी कोणाची निवड करणार ? 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) -  येथील पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक 1 एप्रिलला होत असून सभापती पदावरुन खलबते रंगु लागली आहेत. पद महिलांसाठी खुले असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे; मात्र असे असले तरी भाजप नेते खासदार नारायण राणे कोणाच्या गळ्यात सभापतीची माळ टाकणार? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

येथील पंचायत समितीच्या सभापती मानसी धुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक होत आहे. या ठिकाणी सभापती पदाचे आरक्षण महिलांसाठी खुले असल्याने या ठिकाणी सभापती पदासाठी सक्षम चेहरा देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत मुळ भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या प्राजक्ता केळुस्कर व राणे समर्थक असलेल्या सुनंदा राऊळ यांचे नाव पुढे आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा माजी उपसभापती निकीता सावंत व मावळत्या सभापती मानसी धुरी यांच्याही नावाची चर्चा आहे. सभापती आरक्षण हे खुले असल्याने याच प्रवर्गातील महिला सभापती झाली पाहीजे, असेही काहींचे मत आहे. 

अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत संजना सावंत यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने याठिकाणीही तशी संधी पुन्हा मिळू शकणार, अशी शक्‍यता काहीजण बांधुन आहेत. त्यासाठी खलबते रंगु लागली आहेत. त्यामुळे याठिकाणी नाराजीचा सूर उमटण्याची शक्‍यता आहे. 

उपसभापती पदासाठी अशी आहेत गणिते 
पुढे होणाऱ्या उपसभापती निवडीचे गणित सभापती निवडीवर ठरणार आहे. राणे समर्थकांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडल्यास उपसभापती पद हे मुळ भाजप सदस्याकडे जाणार आहे. उपसभापतीसाठी बाबु सावंत तर संदिप गावडे यांच्या नावाची चर्चा आहे. सभापती पदासाठी प्राजक्ता केळुस्कर व सुनंदा राऊळ या दोघी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. सभापती व उपसभापती यावरुन आत्ताच चर्चा रंगू लागली असून याबाबत सदस्यांच्या बैठका रंगु लागल्या आहेत; मात्र कितीही बैठका झाल्या तरी शेवटी राणे ज्या नावावर शिक्कामोर्तब करणार त्याच्याच गळ्यात सभापतीची माळ पडणार आहे. 
------------- 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT