kiran samant and narayan rane  sakal
कोकण

Kokan Politics: नारायण राणेंनाच का मिळाली रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी? सामंत कुठे पडले कमी? घ्या जाणून

वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ही घेत होते. यामुळे ही जागा सामंतांना मिळते की काय? असे चित्र पाहायला मिळत होते.

Chinmay Jagtap

Ratnagiri Sindhudurg Loksabha: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाच्या जागेवर महायुती म्हणजेच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी तर्फे नक्की कोणाला उमेदवारी दिली जाईल याविषयी प्रचंड सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होता. आज भारतीय जनता पक्षांने या जागेवर नारायण राणे याचं नाव घोषित केलं.

सुरुवातीपासूनच या ठिकाणी कोण उमेदवार असेल याविषयीची मोठ्या प्रमाणावर चर्चा पाहिला मिळत होती. कारण मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील या ठिकाणी निवडणूक लढवायला उत्सुक होते. अशा प्रकारची पोस्ट त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट आणि व्हॅट्सअपच्या माध्यमातून केली होती. यानंतर ते वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ही घेत होते. यामुळे ही जागा सामंतांना मिळते की काय? असे चित्र पाहायला मिळत होते.(Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

महाविकास आघाडी तर्फे ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार असलेले विनायक राऊत यांना देण्यात आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी अशी मागणी शिवसेनेची होती. (Vinayak Raut)

अशा प्रकारचा दबावही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसेना निर्माण करू पाहत होती. मात्र असे जरी असले तरी, या जागेचा तिढा आता सुटला असून नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी दिली आहे.

नक्की कोणत्या कारणावरून रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी नारायण राणे यांना मिळाली? असे कोणते मुद्दे आहेत नारायण राणे यांच्या पत्थ्यावर पडले याविषयी राजकीय विश्लेषक असलेल्या - मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की,

  • नारायण राणे यांचं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये इलेक्टिव्ह मेरिट जास्त आहे. या ठिकाणी नारायण राणे उभे राहिले तर ते जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे नारायण राणे यांना संधी दिली गेली असावी.

  • याचबरोबर राणे वेळोवेळी ठाकरेंवर टीका करत आहेत. ठाकरेंवर टीका करण्याची रणनीती देखील राणेंना फायदेशीर ठरली असावी.

  • तर नारायण राणे यांचे दिल्लीशी असलेले संबंधही चांगले आहेत. यामुळे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • त्याशिवाय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकणामध्ये भाजपचे अस्तित्व असायला हवे असाही आग्रह भाजपचा असणारच. यामुळेच भाजपतर्फे या जागेवर नारायण राणे यांना उमदवारी देण्यात आली असावी.

  • तर दुसरीकडे विनायक राऊत हे मतदारसंघांमध्ये संपर्क ठेवून असलेले नेते आहेत. यामुळे या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांच्यापेक्षा शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला एडवांटेज असू शकेल असेही ते म्हणाले.(Uddhav Thackeray)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भिवडी येथे कारखान्यात भीषण स्फोट; सात ठार, बेकायदा फटाके निर्मिती सुरू असल्याचा दावा

Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

Latest Marathi News Update : भिवंडीत महापौर पदाच्या उमेदवारीसाठी न्यायालयाची अटी-शर्तींसह मुभा

Sunetra Pawar: शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण! सुनेत्रा पवारांनी उचललं कठोर पाऊल; आढावा बैठकीत निर्देश

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

SCROLL FOR NEXT