Why Doctors Working With Black Ribbons In Sindhudurg  
कोकण

सिंधुदुर्गात डॉक्‍टर का करत आहेत काळ्या फीती लावून काम ?

सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - फेसबुकवर डॉ. विवेक रेडकर आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांबद्दल बदनामीकारक व चिथावणीखोर पोस्ट टाकणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून सिंधुदुर्गातील डॉक्‍टरांनी आजपासून काळी फीत आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्गात सुरु असलेल्या या आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती रेडकर हॉस्पिटल रिअर्च सेंटर ट्रस्टचे विश्‍वस्त रविकिरण तोरसकर यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःचा जीव धोक्‍यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी देणाऱ्या प्रवृत्तीबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशा प्रवृत्तीचा प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त करावा व कायद्याच्या माध्यमातून शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. आज सुरु असलेल्या आंदोलनामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, (ima), डॉक्‍टर्स फॅटर्निटी क्‍लब (DFC), असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, सर्जन असोसिएशन ऑफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा चालू ठेवली आहे. अशा समाजातील प्रवृत्तीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT