कोकण

खेड तालुक क्रीडासंकुलचा वापर होणार का 0

CD

- rat३p५.jpg-
P२४M८७४९२
खेड तालुका क्रीडा संकुल

खेड तालुका क्रीडासंकुल वापराची संधी खेळाडूंना कधी मिळणार

प्रशांत सावंत ः नऊ वर्षानंतरही प्रतीक्षा, सेवाभावी संस्थेला देखभालीची जबाबदारी द्या

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या करीता ५ डिसेंबर २०१५ रोजी खेड तालुका क्रीडा संकुल या वास्तूचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. पण गेली नऊ वर्षे होऊनही खेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना या क्रीडा संकुलाचा वापर करण्याची संधीच मिळाली नाही, अशी खंत आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
खेड येथील क्रीडा संकुलाचा वापर फक्त येथील स्थानिक क्लबच्या सदस्यांना बॅटमिंटन खेळासाठी होत आहे. पावसाळी, हिवाळी, उन्हाळी क्रीडा स्पर्धांसाठी तालुक्यातील खेळाडूंना सराव करता येत नाही. बंद असणाऱ्या क्रीडा संकुलामुळे त्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी खेळाडुंमधून मागणी होत आहे. खेळाडूंसाठी लोकार्पण झालेल्या क्रीडा संकुलात कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. क्रीडासंकूल ही वास्तू शोभेसाठीच आहे. गेली अनेक वर्षे खेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व खेळाडूंना या क्रीडा संकुलाचा वापर करता यावा आणि खेळाडूंना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांनी खेड तालुका क्रीडा अधिकारी व रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी यांची रत्नागिरी क्रीडा कार्यालयात भेट घेतली. मात्र त्याची दखल रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी घेतलेली नाही. क्रीडा संकुलाचा वापर खेळाडूंसाठी होणार नसेल तर या सोयीचा काहीच उपयोग नाही. खेळाडूंसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार नसतील तर लवकरच दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने खेळाडूंच्या हिताच्यादृष्टीने आंदोलन करू असा इशारा सावंत यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. कायम बंद व नादुरुस्त असलेले खेड तालुका क्रीडा संकुल हे प्रशासनाला सांभाळता येत नसेल तर दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला क्रीडा संकुलाची निगा राखण्यासाठी व देखभाल करण्यासाठी द्यावे, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT