Will provide funding for the Tiwari Dam Minister Jayant Patil 
कोकण

तिवरे धरणासाठी निधी देणार ; मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन  

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - महाराष्ट्राला हादरवून सोडणारी तिवरे धरण फुटीची घटना घडली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच  या घटनांचा गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धारणांमध्ये गळतीचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधीही उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळूणात पत्रकारांशी बोलताना सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर तालुक्यातील कार्यकर्ता संवाद कार्यक्रम सावर्डे येथे आयोजित केला होता. यानिमित्ताने जिल्हा दौर्‍यावर आलेल्या पाटील यांनी माजी आमदार कै. निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, तिवरे धरण फुटीचा चौकशी अहवाल जलसंधारण खात्याच्या अखत्यारीत येतो. मात्र या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जाईल. एवढेच नव्हे तर या घटनेनंतर राज्यात सर्वच धरणांचे ऑडिट केले जात आहे. त्यामध्ये अति गळती आढळल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना केली जात आहे. यानंतर अर्णव गोस्वामी प्रकरणी ते म्हणाले की, त्या प्रकरणाचा सरकारच्या इमेजवर कोणताही परिणाम होणार नाही. किंवा त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. दोन पीडित कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढे आले आहे. त्यामध्ये दोघांनी आत्महत्या केली असून अशा विषयात त्या पीडित कुटुंबियांवर अन्याय व्हावा, असे कोणालाही अपेक्षित नाही. भाजपने त्याबाबतीत आवाज उठवला तर त्यात काही विशेष नाही. कारण भाजपने तळागाळातील लोकांसाठी कधीही आवाज उठवलेला नाही. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, शुभदा जोशी, शौकत मुकादम, बाबाजी जाधव आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; अनेक कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT