within 100 days above 3000 home are built up in ratnagiri  
कोकण

रत्नागिरीत उभारणार १०० दिवसांत ३ हजार ३१८ घरकुले

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ग्रामीण गृहनिर्माण योजना गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात ८ लाख तर रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ३१८ घरकुले बांधायचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचना विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित महाआवास अभियान ग्रामीण विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून निवासी उपजिल्हधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, सहाय्यक संचालक समाजकल्याण चिकणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संतोष गमरे उपस्थित होते.

या प्रसंगी मिसाळ म्हणाले, उत्तम गुणवत्तेचे घरकुल उभारण्यासाठी प्रशिक्षित गंवडी आवश्‍यक आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले पाहिजे. घरकुलाचे डेमो हाऊस पंचायत समिती आवार किंवा रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी, वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी दाखवा. विविध योजनांमधील प्रलंबित कामांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर 
आढावा घ्यावा. 

या योजनेत सामाजिक संस्थाचा सहभाग घ्यावा. अपूर्ण घरकुलांचा वेगळा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी. घरकुलांना मंजूरी, मंजूर घरांना पहिला हप्ता, घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुल पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण , डेमो हाऊस उभारणे, आधारसिडींग पूर्ण करणे आदी कामे विहित मुदतीत पूर्ण करा.

तालुका        लक्ष्य

चिपळूण        १९३
दापोली         ५६६
गुहागर          ३२७
खेड              ६३१
लांजा              ६३
मंडणगड       ४१२
राजापूर         २५३
रत्नागिरी        ३९५
संगमेश्‍वर      ४७८

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT