Within Three Day Nearabout 500 Serviceman Entered In Sawantwadi Sindhudurg  
कोकण

अबब ! सावंतवाडी तालुका तीन दिवसात दाखल झाले एवढे चाकरमानी

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - ग्रामीण भागात रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांच्या चाकरमान्यांची ओढा सुरूच असून आज 24 तासात 219 जण दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सुरुवातीला येणाऱ्या अडचणीत सुधारणा होत असून या अडचणी कमी होत आहेत; मात्र जिल्ह्यामध्ये दिवसागणिक रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांचा ओढा पाहता चिंतेचे वातावरण कायम आहे. गेल्या तीन दिवसात जवळपास 500 चाकरमानी तालुक्‍यात दाखल झाले आहेत. 

शासनाने जिल्हा, राज्य आणि देशांतर्गत अडकलेल्या नागरिकांना आपापल्या स्वगृही परत येण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत गेली. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नागरिक जिल्ह्यात येत असताना आता मात्र प्रत्येक दिवसाला किमान 100 ते कमाल 250 जण येथील तालुक्‍यातील ग्रामीण भागात दाखल होत आहेत. तालुक्‍यात गेल्या 3 दिवसात ग्रामीण भागामध्ये जवळपास 500 चाकरमानी नागरिक दाखल झाले आहेत.

2 दिवसात 400 नागरिक दाखल झाल्याची नोंद तालुकास्तरावरील कार्यरत असलेल्या कक्षात केलेली आहे. दाखल झालेल्या नागरिकांमध्ये 90 टक्के नागरिकांना संस्थात्मक क्‍वारंटाईन करण्यात येत आहे. 10 टक्के नागरिक हे होम क्वारंटाईन करण्यात येत आहेत. सायंकाळी 5 ते पुढच्या दिवशी सायंकाळी 4 या वेळेत 24 तासात दाखल झालेल्या नागरिकांची नोंद ठेवण्यात येत आहे. तालुक्‍याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 900 ते 1000 दरम्यान एवढे नागरिक तालुक्‍यात दाखल झाले असल्याची माहिती सहायक गटविकास अधिकारी व्ही. एम नाईक यांनी दिली. 

शहरी भागामध्ये दाखल झालेल्या नागरीकांची नोंद वेगळी ठेवण्यात येत असल्याने एकूण तालुक्‍याच्या आकडेवारीत वाढ होऊ शकते. सरकारने अडकलेल्या नागरिकांना आपल्या स्वगृही परतण्याचा हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर चाकरमाने ई - पासद्वारे अधिकृतरित्या जिल्ह्यात यायला सुरुवात केली.

यावेळी सुरुवातीला क्वारंटाईन होण्यासाठी आलेल्या नागरिकांची सोय करताना थोड्याफार अडचणी जाणवल्या; मात्र पूर्वीपेक्षा आता अडचणी कमी होत आहेत अशी माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. नाईक यांनी दिली; मात्र क्‍वारंटाईन केलेल्या शाळेमध्ये दिवसाला शिक्षक नियुक्त असतात. रात्रीच्या वेळी ड्युटीला कोण कार्यरत राहणार? ही समस्या काही ठिकाणी अद्यापही आवासून आहे. अनेक ठिकाणच्या समस्या सोडविण्यास स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.

बऱ्याच ठिकाणी आता ग्रामपंचायत स्तरावरूननही चांगले सहकार्य मिळत असून ग्रामपंचायतीमार्फत क्‍वारंटाईन केलेल्या ठिकाणी रात्र पाळीस गावातील सामाजिक जाण असलेले नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वयंसेवक कार्यरत राहत आहेत. काही ठिकाणी तर चक्क सरपंचही रात्रीच्या वेळी ड्युटी बजावत आहेत. क्‍वारंटाईन जागी ठिकाणच्या समस्या काही अंशी मागे लागल्या तरी जिल्ह्यात चाकरमानी नागरिक ज्या संख्येने येत आहेत ती मात्र मोठी डोकेदुखी स्थानिक तसेच जबाबदार प्रशासनासमोर कायम आहे. 

तीन दिवसात दाखल चाकरमानी.... 
शनिवारी (चार वाजेपर्यंत) - 219 
शुक्रवारी ( ता. 15) - 205 
गुरुवारी (ता. 14) - 109 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: नाशिकमध्ये भाजपची निवडणूक जबाबदारी राहुल ढिकलेंवर

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT