कोकण

चिपळुणात विनाहेल्मेट फिरणाऱ्या 275 चालकांवर कारवाई

कडक निर्बंधामुळे गर्दी ओसरली

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : बाजारेठेत वाढलेली गर्दी लक्षात घेत पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील चिंचनाका येथे शनिवारी बॅरीकेट्‌स उभारून मार्ग सील केला. तसेच विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात 275 जणांवर दंडाची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडक निर्बध लागू केले आहेत. तरीही येथील बाजारपेठेत सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.

गर्दी कमी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार येथील पोलिसांनी शनिवारपासून बाजारपेठेत ठिकठिकाणी बॅरिकट्‌स उभारले. सकाळी 11 नंतर बाजारपेठेतील मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यानंतरही गर्दी होते. त्यामुळे विनाहेल्मेट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. चिंचनाका, वडनाका, खेडेकर क्रिडा संकुल, बाजार पोलिस चौकी, बहादूरशेख नाका येथे पोलिस तैनात करण्यात आले होते.

गेले काही दिवस बाजारपेठेत सकाळच्या वेळी भाजीपाला तसेच अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र आता जुना बसस्थानक व पानगल्ली या दोन्ही ठिकाणी तहसीलदारांनी मनाई आदेश लागू करुन भाग सील केला. यामुळे गर्दी नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. दरम्यान रत्नागिरी आणि चिपळूण येथे जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्मेट सक्ती केली. रविवारी दुचाकीस्वार घरातून हेल्मेट घालून बाहेर पडत होते. हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर रविवारी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारले जात होता. मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: पालकांसाठी आनंदाची बातमी! मुलांसाठी खास NPS वात्सल्य योजना; मुलांना मजबूत आर्थिक आधार मिळणार, फायदे काय?

Pankaja Munde : 'कोणी कितीही ओरडले तरी निवडणूक काळात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास

Latest Marathi News Live Update : पुण्यात आचारसंहिता भंगावर पोलिसांचा कडक दणका; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Ichalkaranji Elections : ‘आपला माणूस’ फॉर्म्युला यशस्वी ठरणार का? अपक्ष उमेदवार ठरू शकतात निर्णायक

Nashik Municipal Election : पॅनलचं जाऊ द्या, माझं बघा! नाशिक मनपा निवडणुकीत 'एक मताचा' छुपा जागर सुरू

SCROLL FOR NEXT