कोकण

कोकण रेल्वेतच महिलेने दिला कन्येला जन्म 

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर - रात्री एक वाजण्याचा सुमार कोकण रेल्वे मार्गावरुन वास्को ते पटना जाणाऱ्या गाडीत महिलेला कन्यारत्न झाले. सहप्रवासी महिलेने मोठ्या धाडसाने या गर्भवतीची सुटका केली. श्वेता सिंग यांच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेतच सुखरुप सुटका झाली. सायरा नवसार आलम (वय 24) असे महिलेचे नाव आहे. 

रेल्वे वेगाने धावत होती. वातानुकूलीत शयनयानात टीसी महेश पेंडसे डब्यांमध्ये राऊंड मारत होते. बी 2 डब्यात त्यांना एका महिलेच्या विव्हळण्याचा आवाज आला. महिला गर्भवती होती. त्यांनी प्रवाशाच्या मदतीने ओळखीच्या महिलेला बोलावले. गर्भवती महिलेच्या प्रसूतीच्या वेदना असल्याने धावाधाव सुरू झाली.

श्वेता सिंग यांनी महिलेची विचारपूस करून परिस्थिती लक्षात घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आवश्‍यक साहित्याची जमवाजमव करत श्वेता सिंग यांनी अत्यंत धाडसाने सायरा आलम हिची रेल्वेतच सुखरुप सुटका केली. सायराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

सायरा तब्येतीने किरकोळ होती आणि हे तिचे चौथे अपत्य असल्याने तिला वेळीच वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. पेंडसे यांनी कोकण रेल्वे कंट्रोल रुमला कल्पना दिली. कंट्रोल रुमने चिपळूण येथे सर्व व्यवस्था उपलब्ध ठेवली. चिपळूण रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर माधवी गांगण, आरोग्य कर्मचारी रेल्वे पोलीस आणि रुग्णवाहिका तत्पर होते. ट्रेन चिपळूणला पोचल्यानंतर नेहमी पेक्षा अधिक वेळ थांबवून सायराला बाळासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. 

सायरा आलम सोबत तिचा भाऊ आणि तिची पाच ते तीन वर्षांची तीन मुले प्रवास करीत होती. या सर्वांना चिपळूण येथे उतरल्यानंतर सायरा आणि तिच्या नवजात कन्येला चिपळूणच्या प्रसिद्ध प्रसूतीतज्ज्ञ रिळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोघीही आता सुखरुप आहेत. 
 
स्टेशन येण्याआधी आणि गेल्यानंतर डब्यांमध्ये राऊंड मारत असतो. यामुळे प्रवाशांच्या अडचणी लक्षात येतात आणि अन्य कोणी पॅसेंजर म्हणून घुसला असेल तरी सतर्क होता येते. यातूनच माणूस म्हणूनही मदत करताना आनंद होतो. 
- महेश पेंडसे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT