women journalists rickshaw stopped beaten and attack 
कोकण

रिक्षा थांबव, नाहीतर रिक्षा वाकवलीत फुटेल, अशी धमकी देत महिला पत्रकाराशी केले गैरवर्तन

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : वाकवली गावतळे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये काय आहे, अशी विचारणा ट्रक चालकाकडे केल्याने तसेच याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने त्याचा राग मनात धरून एका महिला पत्रकाराची रिक्षा अडवून तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने दापोली पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार टेटवली येथील संशयित कात व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

३ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास एक महिला पत्रकार अरविंद काते यांच्यासोबत टेटवली येथील ठेकेदार नितीन तांबटकर यांना भेटण्यासाठी जात होत्या. या वेळी वाकवली येथील नाक्‍यावर त्यांना एक ट्रक लाकडे भरून जात असलेला दिसून आल्यावर त्यांनी हा ट्रक थांबवला. ट्रकमध्ये काय आहे, याची विचारणा चालकाला केल्यावर त्याने ट्रकमध्ये खैर असल्याचे सांगितले. या महिलेने वाहतुकीचा पास आहे का, याची विचारणा केल्यावर चालकाने वाहतूक परवाना नाही, आम्ही सुप्रिया कात फॅक्‍टरीमध्ये जात असल्याचे सांगून चालक ट्रक घेऊन निघून गेला. या महिला पत्रकाराने याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

सायंकाळी त्यांना अरविंद काते यांनी विशाल मालवणकर यांच्या सुप्रिया कात फॅक्‍टरीच्या गेटवर सोडले व काते गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी तेथे आले व त्यांनी ट्रक कोठे गेला आहे, असे विचारल्यावर आपण ट्रक गेटच्या आत गेला असल्याचे त्यांना सांगितले. 

रिक्षातून बाहेर ओढले व अश्‍लील वर्तन 
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी गेटमधून आत गेल्यावर पत्रकार टेटवलीतून वाकवलीकडे चालत निघाल्या. वाटेत त्यांनी रिक्षा थांबवली व वाकवलीकडे जात असताना रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षापाठून विशाल मालवणकर हे त्यांच्या चारचाकीमधून आले व त्यांनी रिक्षा चालकाला रिक्षा थांबव, नाहीतर रिक्षा वाकवलीत फुटेल, अशी धमकी दिली. रिक्षा थांबवल्यावर त्यांनी आपल्याला रिक्षातून बाहेर ओढले व आपल्याशी अश्‍लील वर्तन करून मारहाण केल्याची तक्रार या महिला पत्रकाराने दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT