women murder in amboli ghat four people are arrested by a police in sawantwadi
women murder in amboli ghat four people are arrested by a police in sawantwadi 
कोकण

आंबोली घाटात 'त्या' महिलेचा घातपातच ; चार संशयितांना केले गजाआड

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : आंबोली घाटात सापडलेल्या महिलेच्या घातपात प्रकरणाचा अखेर येथील पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणातील चार संशयितांना आज गजाआड केले. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक अमित गोते यांनी मोबाईल कॉल रेकॉर्डवरून मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास अवघ्या २१ दिवसांत लावला. याप्रकरणी शहरातील दोघांना तर कोलगावमधील दोघांना ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण ऊर्फ योगेश रवींद्र आडणेकर (वय २३, रा. कोलगाव ता. सावंतवाडी ), योगेश सुभाष कांबळे (२३, रा. गरड सावंतवाडी) अशी त्यांची नावे असून यातील अन्य दोघे अल्पवयीन आहेत. याप्रकरणी या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्‍यातील एका गावातील एक महिला गेल्या महिन्यात (३१) ला बेपत्ता असल्याची नोंद येथील पोलिस ठाण्यामध्ये झाली होती. याचा तपास सहायक उपनिरीक्षक शरद लोहकरे हाताळत होते. आंबोली घाटामध्ये सात सप्टेंबरला सेल्फी काढत असताना दोन युवकांना एका महिलेचा मृतदेह दिसला होता. बेपत्ता महिलेचा तपासाचे प्रकरण उपनिरीक्षक अमित गोते हाताळत होते. या प्रकरणी गोते यांनी आंबोली, बांदा या ठिकाणचे फुटेज तपासले होते. संबंधित महिलेबाबत गोवा, कर्नाटकातील इतर जिल्ह्यांना माहिती दिली होती.

तालुक्‍यातील एका कुटुंबीयांनीही ती महिला नसल्याचेही सांगितले होते. संबंधित महिलेचा व्हिसेरा आणि डीएनए तपासणीसाठी रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत पाठविला होता. त्यानंतर या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेची अधिक माहिती मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत तालुक्‍यातील बेपत्ता असलेल्या महिला व आंबोली घाटात सापडलेले महिला ही दोन्ही प्रकरणे हाताळण्यासाठी समांतर तपास सुरू केला.

बेपत्ता महिलेच्या मोबाईलवरील रेकॉर्ड आधारे पोलिस कर्मचारी नवनाथ शिंदे यांनी माहिती जमा केली. त्यावरून संशयितांच्या नावांची यादी तयार केली. यादीमधील संबंधित व्यक्तींची छाननी सुरू केली. या व्यक्तींची त्यांच्या गावातूनही माहिती जमा केली. या सर्व तपासावरून संशयितांभोवती फास आवळून पोलिसांच्या पथकाने एक एक करीत चौघांनाही ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी एकाला रूममधून व दुसऱ्याला गार्डनमधून तर काल आणखी संशयिताला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तसेच खाकी हिसका दाखवल्यानंतर त्याने आणखी एकाचे नाव उघड केले.

चौघांच्या जबानीतील सुसंगती तपासून पुढील कार्यवाहिस वेग दिला आहे. खून झालेल्या महिलेला संशयित फिरायला घेऊन गेले होते, अशी माहिती जबाबात पुढे आली. संबंधित महिलेचा खून कसा झाला किंवा ते फिरायला गेलेले असताना हृदयविकाराचा झटका आला की आणखी काही घडले, याबाबत पोलिसांनीनकोणत्या प्रकारची माहिती दिली नाही. पोलीस उपनिरीक्षक अमित गोते म्हणाले, आणखी तपासानंतर सर्व धागेदोरे स्पष्ट होतील. 

दरम्यान या प्रकरणांमध्ये एक मोटारही ताब्यात घेण्यात आली आहे. संबंधित महिलेच्या व्हिसेरा अहवालाकडेही लक्ष आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित गोते, सहायक उपनिरीक्षक शरद लोहकरे, नवनाथ शिंदे, प्रसाद कदम, सतीश कविटकर, भूषण भोईर यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक तौफिक सय्यद त्यांच्याकडे सोपवला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT