Women Success In Milk Business Kokan Marathi News
Women Success In Milk Business Kokan Marathi News 
कोकण

'तिच्या' हाती सोळा जनावरांची दावी

अजय सावंत

कुडाळ (सिंधुदूर्ग) : जिद्द, चिकाटी, मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करून माणगाव खोऱ्यातील निवजे येथील महिला ज्योती पावसकर यांनी शेती क्षेत्रात तसेच पशूसंवर्धनात आमूलाग्र बदल केला आहे. त्यातून त्यांनी आधुनिक शेती क्षेत्रातील महिला उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली. त्यांची दुग्ध व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी बाब निश्‍चितच इतरांना प्रेरणा देणारी म्हणावी लागेल. 

आजच्या संगणकीय युगात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे हे निश्‍चितच कौतुकच. ग्रामीण भागातील शेतकरी महिलाचा विचार करता त्या गांडूळ खत प्रकल्प आदींच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील महिला उद्योजिका म्हणून पुढे येत आहेत. कृषी क्षेत्रात शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी कशी करावी, आधुनिक शेती क्षेत्रातून आर्थिक उन्नती कशी साधावी हा उदात्त दृष्टिकोन ठेवून पावसकर यांनी केलेली शेती क्षेत्रातील कामगिरी निश्‍चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल. 

हेही वाचा- गोकुळच्या सत्ताधाऱ्यांमध्ये उभी फूट...

 शेती क्षेत्रात आता महिला

कृषी पर्यटन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या निवजे गावातील 45 वर्षीय पावसकर यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. स्वत:चे कुटूंब सांभाळताना त्यांनी शेती व दुग्ध व्यवसायात केलेली प्रगती वाखाखण्याजोगी आहे. निवजे गावातच गेल्या वर्षी गोकुळने दूध डेअरी सुरू केली असून गतवर्षी 17 लिटर प्रति दिन दूध संकलन आता प्रतिदिन 200 लिटरच्या पुढे आहे. 

हेही वाचा- Photo खुशखबर : मधुमेही रुग्णांनो ही साखर बिनधास्त खावा...

गांडूळ खत निर्मितीचा माणस

सध्या दुग्धोत्पादन आणि शेतीतील उत्पन्नावरच घर चालते. एकूण शेती 3 एकर आहे. पावसाळ्यात तसेच रब्बीमध्ये भात, चवळी व कुळीथ. नोकरीला कोणीही नाही. नवरा व दोन मुले आहेत. मुलेही शेतीत मदत करतात. विशेष म्हणजे त्या गांडूळ खत पुढील महिन्यापासून सुरू करणार आहेत. कृषी क्षेत्रात वाटचाल करताना पावसकर यांना तालुका कृषी विभागाचे सहकार्य मिळाले. शिवाय शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरून लावणी करून अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, या दृष्टिकोनातून त्यांना कृषी सहाय्यक निलेश उगवेकर यांचे सहकार्य लाभले आहे. 

सध्या 16 जनावरे 
सध्या 16 म्हैशी आहेत. त्यांनी 2012 मध्ये प्रथम 2 म्हैशी घेतल्या. 2015 मध्ये आणखी 3 म्हैशी घेतल्या. गतवर्षी अजून 2 म्हैशी घेतल्या. 2014 मध्ये माहेरहून 1 गाय भावाने भेट दिली. कालांतराने जनावरांची संख्या वाढली. यापैकी 4 म्हैशी रोज 22 ते 24 लिटर दुध देतात. 3 महिन्यांपूर्वी रोज 30 लिटर दुध मिळत होते. सध्या 2 म्हैशींचा भाकडकाळ असून पुढील 3 महिन्यात आणखी 2 म्हैशींचे दूध सुरू होईल. त्यामुळे रोजचे दूध उत्पादन प्रत्येक दिवशी 30 लिटरच्या पुढे जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT