Work from Nature by MTDC for those who bored in Corona work from home 
कोकण

कोरोनाने वर्क फ्राॅम होमला कंटाळलेल्यांसाठी एमटीडीसीकडून "वर्क फ्रॉम नेचर' 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनामुळे आयटीसह काही मोठ्या कंपन्यांमधील बहुतांशी कर्मचारी वर्क फ्रॉम होमला कंटाळले आहेत. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात काम करण्याची सुविधा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी "वर्क फ्रॉम नेचर' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे, हरिहरेश्वर या दोन ठिकाणांची निवड केली आहे. 

कोकणात रायगडमधील हरिहरेश्वर, रत्नागिरीतील गणपतीपुळे, वेळणेश्‍वर, सिंधुुदुर्गातील कुणकेश्‍वर, तारकर्ली देवबाग या ठिकाणी ही वर्क फॉम नेचर ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याठिकाणी एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये 50 टक्के सूट ठेवले आहेत. हा प्रस्ताव एमटीडीसीच्या येथील कार्यालयाकडून प्रधान कार्यालयाकडे पाठविला असून मंजुरी मिळाल्यानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबविली जाईल, असे एमटीडीसीकडून सांगण्यात आले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग - व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फॉम होमवर भर दिला. मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये ती काळाची गरजच होती. कार्यालयात गर्दी टाळता येत असून कोरोनाचा प्रसारही रोखणे आवश्‍यक होते. कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही अनेक खासगी कंपन्यांनी अजुनही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्याच सूचना दिलेल्या आहेत. वर्क फ्रॉम होममुळे अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक तणाव येत आहे. याबाबत अनेकांच्या तक्रारी येऊ लागलेल्या आहेत. घरातल्या चार भिंतीत आठ ते बारा तास काम करणे त्यांना असह्य झाले आहे. अशांसाठी एमटीडीसीने वेगळी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

पर्यटन विकास महामंडळ लॉकडाऊनपासून परिसर, खोल्या, उपाहारगृहांचे निर्जंतुकीकरण करत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरण पुढील दोन वर्ष करण्यात येणार आहे. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्‍सीमीटर अशी खास व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी तसेच त्यांना मास्क, फेस शील्ड, हॅण्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर दिले आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठीचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले आहे. 

...असाही उपयोग 
एमटीडीसीच्या निसर्गरम्य अशा निवासस्थानाचा उपयोग पर्यटकांना लग्न सोहळे, प्री वेडिंग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट यासाठी करता यावा यादृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत. वर्क फ्रॉम नेचरमध्येच याचीही परवानगी मिळवण्यात येणार आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

Pune Garbage News: घनकचरा विभागातील ‘क्रीम पोस्टिंग’ला लगाम? पुणे महापालिकेत एका ठेकेदाराला ५०० टनांपेक्षा जास्त क्षमतेचे कचरा प्रकल्प न देण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT