rajan salavi with eknath shinde  
कोकण

मरेपर्यंत उद्धव अन् आदित्य ठाकरेंसोबत काम करणार; शिंदे गटात प्रवेशावर साळवींचं स्पष्टीकरण

राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या.

सकाळ डिजिटल टीम

राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या.

रत्नागिरी : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी माझी निष्ठा आहे. मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असं वक्तव्य कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केलं आहे.

राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या. राजन साळवी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचीही चर्चा होती. मात्र मी अशा प्रकारे कोणतीही भेट घेतली नसून माझ्या बाबतीत अशा अफवा पसरवल्याबद्दल दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.

काय म्हणाले राजन साळवी?

आपण शिंदे गटाच्या वाटेवर नाहीत, हे स्पष्ट सांगताना राजन साळवी म्हणाले, कालपासून माझ्यासंदर्भातील बातम्या येत होत्या. गेले ४० वर्ष मी शिवसैनिक म्हणून काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळेचा आमदार आणि उपनेता म्हणून महाराष्ट्रात काम करतोय. राजकीय घडामोडींमुळे अशी चर्चा असतील. पण माझी निष्ठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी आहे. मी प्रामाणिकपणे ठाकरेंसोबत आहे. मी खुलासा करतोय.. मरेपर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत काम करणार आहे. तोच माझा अंत आहे.

उपनेता म्हणून राज्यभर दौरा करणार…

आपण शिवसेना सोडणार नाही, असे सांगतानाच राजन साळवी यांनी यापुढे शिवसेनेचा उपनेता म्हणून राज्यभरातील शिवसैनिकांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, विधिमंडळाच्या अधिवेशनात मी पहिल्या दिवशी सहभाग घेतला. नंतर मी आदित्य ठाकरेंसोबत दौऱ्यावर होतो. अलिबाग, महाडच्या विधानसभा मतदार संघात गेलो. तेथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना बांधणीसाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मी राज्यभर सहभागी होत आहे. भविष्यातही शिवसेनेचा उपनेता म्हणून मी राज्यभर दौरा करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT