Workers worried because Coronavirus konkan sindhudurg 
कोकण

मुलांच्या काळजीने व्यथित, पण...

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) -  मुलांच्या काळजीने व्यथित होऊन काल (ता.10) रात्री कर्नाटकमध्ये पायी जाणाऱ्या 15 ते 20 कामगारांना प्रशासनाच्यावतीने तुमच्या मुलांची काळजी घेऊ. तुम्ही येथेच थांबा, असे तहसीलदार रवींद्र नाचणकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी सांगितल्यानंतर हे सर्व कामगार मागे परतले. सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजन नाईक यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. 

कोरोना विषाणू पार्श्‍वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. गेल्या काही दिवसांपासून बाहेर असणारे आपआपल्या गावी पायी येत आहेत. प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली असतानासुद्धा आपल्या कुटूंबातील मुलांच्या काळजीपोटी इतर बाबतीत पायी तीनशे ते चारशे किलोमीटर चालत येत आहेत. असाच प्रकार काल (ता.10) रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान घडला.

कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील बरदेनाळ येथील 15 ते 20 जणांनी आपली पर्यायी व्यवस्था म्हणून पायी जाण्याचा मार्ग अवलंबला. ते शहरात गेले कित्येक वर्षे कामानिमित्त आहेत. काल (ता.10) रात्री डोक्‍यावर साहित्य घेऊन कर्नाटकच्या दिशेने महिला व पुरुष पायी जात असताना पत्रकार नाईक यांच्या निदर्शनास आले. श्री. नाईक यांनी विचारणा केली असता त्यांनी आम्ही इथून पायी कर्नाटकला जात आहोत, असे त्यातील बसापा चव्हाण यांनी सांगितले. आमच्या सर्वांच्या मुलाच्या काळजीसाठी 370 किलोमीटर पायपीट करून तिकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. नाईक यांनी तुमच्याशी प्रेमाने बोलतो. या ठिकाणी प्रशासन कुठलीही कमतरता भासू देणार नाही. तुम्ही जाऊ नका येथून जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला आंबोली येथे पोलिस पुढे सोडणार नाहीत. या ठिकाणी राहूनच तुमची काळजी घ्या. असे सांगत याबाबत त्यांनी तहसीलदार रवींद्र नाचणकर, पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी तहसीलदार व सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे व पोलिस दाखल झाले. प्रशासनसह माजी नगराध्यक्ष विनायक राणे, पत्रकार नाईक, रवी गावडे, निलेश तेंडुलकर, माजी सभापती सुनील भोगटे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. 

कामगार वळले मागे 
तहसीलदार नाचणकर यांनी विचारणा केली असता त्यांच्यातील चव्हाण यांनी सांगितले, की आम्ही 18 ते 20 जण आहोत. मुलांच्या काळजीपोटी येथून पायी जाणार आहोत. त्यावर तहसीलदार म्हणाले, तुम्हाला इथून जाता येणार नाही. तुमच्या मुलांची प्रशासनामार्फत काळजी घेतली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्‍यक उपाययोजना करण्यात येईल. सहाय्यक पोलिस निरीक्षक हुलावळे म्हणाले, तुमचा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यानंतर कामगार मागे वळले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikki Bhati : CCTV फुटेज, रुग्णालयाच्या Memo ने उलघडले निक्कीच्या हत्येचे गूढ; हुंड्यासाठी होत होता छळ, पतीला होणार फाशी?

मालिकेत तर संस्कारी पण घरी सून म्हणून कशी वागते मृणाल दुसानिस? खऱ्या आयुष्यातील सासूबाई म्हणाल्या- ती स्क्रीनवर जशी दिसते...

Pune Ganesh Festival: माधुरीचं काय चुकलं? पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायची सुमित्रा हत्तीण, काय आहे इतिहास?

शाहरुख-दीपिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाली एफआयआर, नक्की काय आहे प्रकरण?

Ganesh Chaturthi 2025: एकदंतासमोर राशींनुसार करा 'या' मंत्रांचा जप, अडचणींच्या फेऱ्यातून होईल सुटका

SCROLL FOR NEXT