कोकण

न्यूझीलंडच्या फायटोटॅक्सा नियतकालिकात झळकली ‘जैतापुरेंनसीस चांदोरे-एस. आर. यादव’ फुलवनस्पती!

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्याच्या पश्‍चिम किनारपट्टी भागातील जैवविविधता गेल्या काही वर्षामध्ये विविध संशोधनातून प्रकाशात आली आहे. त्यामध्ये आता कातळावरील डबक्यात उगवून फुलणार्‍या नव्या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीची भर पडली आहे. जैतापूर (Jaitapur)परिसरातील साखर, कोंबे, करेल आदी परिसरातील कातळावरील डबक्यात फुलणार्‍या जांभळी मंजिरीवर्गीय पोगोस्टेमॉन Pogostemon‘जैतापूरेंनसींस चांदोरे व एस.आर.यादव’ या जागतिकस्तरीय फुलवनस्पतीच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कातळ परिसर जगाच्या नकाशावर आला आहे. (world-class-flowering-research-Jaitapurensins-Chandore-and-SR-Yadav-rajapur-ratnagiri-marathi-news)

फुलांचा आकर्षक तुरा.

सुमारे पाच वर्षाच्या संशोधनानंतर या फुलवनस्पतीचा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ. एस.आर.यादव, राजापूरच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरूण चांदोरे, त्यांचे संशोधक विद्यार्थी देवीदास बोरूडे, दक्षिण कोरीयाच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे डॉ. असिफ तांबोळी, प्रा. डॉ. संजय गोविंदराव, नाशिक येथील व्ही. एन. नाईक महाविद्यलायचे अविनाश घोलवे आदींनी या फुलवनस्पतीचा शोध लावला आहे. पोगोस्टेमॉन हा तुळशीवर्गीय कुळातील गण असून याच्या जगामध्ये 86 प्रजाती आहेत. त्यापैकी 41 प्रजाती भारतामध्ये आढळतात. त्यातील 19 प्रजाती ह्या प्रदेशानिष्ठ आहेत.

पावसाळ्यात पाण्यात दिसणारी फुलवनस्पती

कोकणातील कातळावरील वनस्पतींचा अभ्यास करताना 2015 मध्ये ही फुलवनस्पती प्रथम संशोधकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर तिचा सविस्तर अभ्यास केला असता जांभळी मंजिरीच्या म्हणजेच पोगोस्टेमॉन डेक्कनेसींसच्या जवळची असल्याचे लक्षात आले. त्यानंतर केलेला सखोल अभ्यास आणि संशोधनानंतर या फुलवनस्पतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

संशोधित फुलवनस्पती.

या नव्या फुलवनस्पतीचे संशोधन न्यूझीलंड येथून प्रकाशित होणार्‍या फायटोटॅक्सा या जागतिकस्तरीय नियतकालिकामधून गत आठवड्यात प्रकाशित झाले आहे. या संशोधनात आबासाहेब मराठे विद्यालयाचे प्राचार्य डॉ पी.जी. पवार, प्रा. एस.जी. मेंगाळ, डॉ. विनोदकुमार गोसावी, शरद कांबळे, नंदकुमार साळुंके आदींसह भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन मंडळाचे सहकार्य लाभले. नव्या फुलवनस्पतीच्या शोधकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.

पाण्यात दोर्‍यासारखी दिसणारी वनस्पतीची पाने

संशोधित फुलवनस्पतीची वैशिष्ट्ये

या वनस्पतीच्या सुरूवातीच्या पाण्यातील वाढीच्यावेळी पाने दोर्‍यासारखी बारीक असतात.

फुले गुलाबी रंगाची आणि बारीक असून त्यांची लांबी 5.मी.मी

पुंकेसर 4 व गुलाबी रंगाचे आणि 4 ते 5 मी.मी. लांब

चार भाग असलेल्या पाकळ्यांचा रंग सफेद असून त्यांची लांबी 3 मीमी

पाणी कमी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून फुलांचा तुरा येण्यास शुभारंभ

फुले आणि फळांचा नोव्हेंबर ते फेबुवारी असा कालावधी

फक्त जैतापूरत्या 5 कि.मी. परिसरामध्ये प्रदेशानिष्ठ वनस्पतीची लांबी 3 फुटापर्यंत पसरते

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फुललेली फुले

प्रा.डॉ. एस.आर.यादव, प्रा. अरूण चांदोरे आणि सहकार्‍यांनी यापूर्वी कातळ परिसरामध्ये फुलणार्‍या फुलवनस्पतींचा शोध लावला आहे. त्यांचे विविध नामकरण करण्यात आले आहे. मात्र, यावेळी संशोधित करण्यात आलेली ’जैतापूसेंसीस चांदोरे व एस.आर.यादव’ ही फुलवनस्पती जैतापूर परिसरात आढळल्याने तिला जैतापूर गावाच्या नावावरून नाव देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: १२ तास ट्रॅफिक जाम! मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रात्रभर वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

Gokul Milk Politics : शौमिका महाडिकांनी कंबर कसली, डिबेंचर्सच्या मुद्दावरून ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा...

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली

आता आव्हान शहरी नक्षलवादाचं, ६१ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणावेळी फडणवीसांचं विधान

Lac Or Lakh: चेकवर 'Lakh' लिहावं की ‘Lac’? आरबीआयने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT