कोकण

''यक्षगान''ने जिंकली आंदुर्लेवासीयांची मने

CD

swt162.jpg
83977
आंदु्र्लेः महाभारतातील चक्रव्यूह पर्वावरील यक्षगान नाट्य कलाकृतीतून उडपी-कर्नाटक येथील कलावंतांनी रसिकांची मने जिंकली. (छायाचित्रः अजय सावंत)

‘यक्षगान’ने जिंकली आंदुर्लेवासीयांची मने
नाट्यकृतीस उत्स्फूर्त प्रतिसादः कर्नाटकी कलावंतांकडून मराठीत सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः महाभारतातील वीर अभिमन्यू चक्रव्यूह पर्वावरील यक्षगान नाट्य कलाकृती सादर करीत उडपी (कर्नाटक) कलावंतांनी आंदु्र्ले येथील नाट्य रसिकांची मने जिंकली. ‘यक्षगान’ या लोककलेचा नाट्यानुभव आंदुर्लेवासीयांना वेगळीच अनुभूती देऊन गेला.
यक्षगान हे कन्नड भाषेत सादर होते; मात्र आंदु्र्ले येथे हे नाटक मराठी भाषेत सादर करण्यात आले. यात संगीत साथ केवळ मृदल (मृदंगाचा एक प्रकार), चंडे, मट्टा या वाद्यांनी दिली. मुख्य सूत्रधार हा बागवती असतो. गुरुवर्य संजीव सुवर्णा यांनी ही जबाबदारी पेलली. रत्नाकर शेणई यांनी मट्टा वादन करून उत्तम साथ दिली. हे नाट्य महाभारतीय युद्ध प्रसंगावर आधारित आहे.
चक्रव्यूह भेदण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करणाऱ्या बालवीर अभिमन्यूची भूमिका आदित्य भट याने साकारली. तर अभिर मयोवर यांचा गुरू द्रोणाचार्य भाव खाऊन गेला. या यक्षगान नृत्य-नाटकातील सर्व पात्रे उच्चशिक्षित आहेत. विशेष म्हणजे, त्यांना मराठी भाषा येत नाही. तरीही प्रा. विजय फातर्फेकर यांनी त्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण दिले व मराठीतील एक अमूल्य यक्षगान कलाकृती रसिकांना पाहायला मिळाली.
या नाट्यातील जयंद्रथ ही खलनायकी भूमिका रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. ती कलाकार प्रशांत याने ताकदीने सादर सादर केली. त्याला अंजली मेमन, पल्लवी कुडगी, श्रृती बंगेरा (सुभद्रा), सौम्या, प्रज्ञा, पांडुरंग नाईक, अमृत वाणी, श्रीराव आदी कलावंतांनी उत्तम साथ दिली. लोकनाट्य असूनही सुबक सादरीकरण हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला.
भरजरी वेषभूषेने यक्षगान नाट्य खुलले. त्याला आंदु्र्ले परिसरातील नाट्यप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. यावेळी दिगंबर सामंत, डॉ. अनील तेंडोलकर, डॉ. उमाकांत सामंत, प्रा. विजयकुमार फातर्पेकर, सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच गोविदं मोर्ये, श्री चामुंडेश्वरी मंदिर समितीचे पदाधिकारी, चंद्रकात पाटील व मंडळी, संतोष पाटील, कलाशिक्षक संदीप साळसकर उपस्थित होते. आभार प्रा. फातर्फेकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT