Masali Sakal
कोकण

सरत्या वर्षाला निरोपासाठी खवय्यांची मासळीला पसंती; मासळी विक्रेत्यांची चलती

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सारेच जण सज्ज झाले आहेत. मात्र रात्रीच्या संचारबंदीमुळे अनेकांनी घरून किंवा फार्महाऊसवर थर्टीफर्स्ट साजरा करण्याचे नियोजन केले आहे.

अमित गवळे

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सारेच जण सज्ज झाले आहेत. मात्र रात्रीच्या संचारबंदीमुळे अनेकांनी घरून किंवा फार्महाऊसवर थर्टीफर्स्ट साजरा करण्याचे नियोजन केले आहे.

पाली - सरत्या वर्षाला निरोप (send up) देण्यासाठी सारेच जण सज्ज झाले आहेत. मात्र रात्रीच्या संचारबंदीमुळे अनेकांनी घरून किंवा फार्महाऊसवर थर्टीफर्स्ट साजरा (31st Celebration) करण्याचे नियोजन केले आहे. आणि यासाठी मासळीला (Masali) सर्वाधिक पसंती आहे. ऐनवेळी मासळी कमी पडू नये तसेच ऐनवेळी किंमत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांनी स्थानिक किंवा घाऊक मासळी विक्रेत्यांकडे आगाऊ बुकिंग (Booking) केली आहे. त्यामुळे मासळी विक्रेत्यांची चलती झाली आहे.

जिल्ह्याला तब्बल 240 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. आणि मासेमारीचा हंगाम देखील जोरात आहे. त्यामुळे ताजे मासे मुबलक उपलब्ध आहेत. परिणामी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी खवय्यांनी मासे खाण्याला पसंती दर्शवली आहे. वडखळ येथील गिरीश म्हात्रे यांनी सांगितले की थर्टी फर्स्टसाठी मासळीची आगाऊ बुकिंग केली आहे. त्यामुळे मासळी परवडणाऱ्या किंमतीत व ताजी मिळेल. तर औरंगाबाद येथील पर्यटक अविनाश भोसले म्हणाले की थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी नातेवाईक दिवेआगर येथे आले आहेत. त्यांनी ताजी मासळी आधीच बुकिंग केली आहे. शिवाय घेऊन देखील येणार आहेत. पालीतील मासळी विक्रेता म्हणाले की 31 तारखेला मासळी खरेदीसाठी ग्राहकांनी खूप गर्दी होईल. खूप मोठ्या प्रमाणात मासळीची विक्री होण्याची शक्यता आहे.

आठवडाभरापूर्वीच अनेकांनी माशांची आगाऊ बुकिंग केली आहे. कारण थर्टीफर्स्टला माशांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. शिवाय माशांची कमतरता देखील भासू शकते. ताजे मासे घेण्याकडे अनेकांचा कल आहे.

- गौरी मनोरे, मासळी विक्रेत्या, पेण-पाली

या माशांना पसंती

खास करून सुरमई, पापलेट, मोठी कोळंबी, बांगडा व रावस अशा माशांना अधिक पसंती आहे. शिवाय खेकड्यांना देखील मागणी आहे.

सध्याचे मासळी दर प्रतिकिलो

  • बोंबील - 200 रुपये प्रतिकिलो

  • पापलेट, सुरमई, घोळ, रावस - 800 ते 1000 प्रतिकिलो,

  • मांदेली - 100 रुपये प्रतिकिलो

  • कोलंबी - 400 रुपये प्रतिकिलो

  • मोठी कोलंबी - 800 रुपये प्रतिकिलो

  • बांगडा मालवणी - 250 रुपये प्रतिकिलो

  • हलवा - 400 ते 500 रुपये प्रतिकिलो

  • टोळ - 300 प्रतिकिलो

  • कुपा - 200 ते 300 रुपये प्रतिकिलो

  • पोचे - 800 प्रतिकिलो

  • चकला - 400 ते 600 रुपये प्रतिकिलो

31 तारखेला या सर्व माशांच्या किंमतीत 40 ते 50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT