this year festival of holi not celebrated in konkan ratnagiri 
कोकण

कोकणकर यंदा शिमग्यात घरोघरी पालखी नेण्यावर बंधने; चाकरमान्यांना कोरोना चाचणी अत्यावश्‍यक

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिमगोत्सवासाठी मुंबई-पुणे येथून अनेक जण येण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोरोना 
प्रतिबंधित क्षेत्रामधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना चाचणी अत्यावश्‍यक आहे. अन्य क्षेत्रातील लोकांसाठी एसपीओ २ चाचणी, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक आहे. त्यासाठी गावागावांत स्क्रिनिंग सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच पालख्या घराघरांत नेण्यावर बंधने घालण्यात आली असून, पालखीबरोबर जाणाऱ्यांना कोरोना चाचणी अत्यावश्‍यक आहे. दरम्यान, शिमगोत्सव, होळी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

  • छोट्या होळ्या आणून मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करावा
  • मुंबईकरांनी गावी न येण्याचे आवाहन करावे
  • केबल नेटवर्क, फेसबुक व वेबसाईट आदीद्वारे चाकरमान्यांना होळीचा कार्यक्रम पाहणे शक्‍य होईल
  • प्रतिबंधित क्षेत्रामधून रत्नागिरी जिल्ह्यात होळीसाठी येणाऱ्यांकडे ७२ तासांपूर्वीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल आवश्‍यक
  • प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लोकांना एसपीओ २ चाचणी व थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
  • लोकांच्या सोयीसाठी नागरी व ग्राम कृतिदलामार्फत स्क्रिनिंग सेंटर उभारावेत
  • या केंद्रांवर सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवावे
  • कोरोनासदृश लक्षणे असल्यास संबंधितास शिमगोत्सवात सामील होता येणार नाही 
  • पन्नासपेक्षा अधिक लोकांची गर्दी झाल्यास, आदेशाचे उल्लंघन केल्यास आणि कोरोनाचा शिरकाव दिसून आल्यास ते क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले जाईल
  • खेळे, नमन आदी कार्यक्रम आयोजित करू नयेत
  • धूलिवंदन व रंगपंचमीला रंग उधळण्याचे टाळावे
  • छोट्या-छोट्या समूहात रंगपंचमी करावी.

पालखीसाठी नियमावली

  • पालखी घरोघरी नेण्यात येऊ नये
  • पालखी गर्दीमध्ये नाचविता येणार नाही
  • मंदिर विश्वस्त- पालखीधारकांना चाचणी बंधनकारक
  •  मोजक्‍या लोकांनीच पालखीची रूपे लावावी
  •  पालखी भेटीसाठी मानकऱ्यांसह २५ ग्रामस्थ 
  •  पालखी शक्‍यतो वाहनातून न्यावी.
  •  पालखीबरोबर ५० पेक्षा अधिक गर्दी नको
  •  दर्शनाच्या वेळा ठरवून द्याव्यात. 
  •  सहाणेवर दर्शनासाठी दिवस नेमून द्यावा 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT