for this year the prati pandharpur kartiki festival is stopped due to corona in ratnagiri 
कोकण

यंदा प्रतिपंढरपूरच्या कार्तिकी जत्रेत विठुरायाचे फक्त मुखदर्शनच

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोरोना महामारीचे संकट अजून दूर झाले नसल्याने शासनाच्या आदेशानुसार अटी आणि शर्थीचे पालन करून कार्तिकी एकादशी उत्सव धार्मिक विधी पार पाडून साजरा होईल. पांडुरंगाचे केवळ मुखदर्शन होईल. यात्रा किंवा जत्रा भरवली जाणार नाही, त्याची जबाबदारी संस्था घेणार नाही, असा खुलासा येथील प्रतिपंढरपूर व ऐतिहासिक अशा विठ्ठल मंदिर संस्थेने केला आहे. यामुळे काही लाखांची उलाढाल ठप्प होणार आहे. 

जिल्ह्यात सुमारे पन्नासहून अधिक श्री विठ्ठल रुखुमाई मंदिरे आहेत. रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव, चिंद्रवली, पूर्णगड यासह सर्वच ठिकाणी उत्सव होणार नाहीत. फक्त धार्मिक विधी पार पडणार आहेत. जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्येही कोणतीही यात्रा, जत्रेचे आयोजन करण्यात येणार नाही. त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या यात्रेची प्रथा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे. यंदा आषाढी एकादशीलाही मंदिरे बंद असल्याने कोठेही यात्रा झाली नव्हती. 

शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनीसुद्धा सांगितले, पोलिसांनी जी नोटीस जारी केली आहे तिचे शहरातील सर्व व्यापार्‍यांनी स्वागत केले आहे. बाहेरील फिरते व्यापारी शहरामध्ये दाखल होतात व मध्यवर्ती बसस्थानकापासून संपूर्ण शहराला वेढा घालून आपली दुकाने फुटपाथवर थाटतात. त्याला आमचा विरोध असून फेरीवाल्यांनी यंदा दुकाने थाटण्यास येऊ नये. स्थानिक व्यापार्‍यांनी दुकानासमोर अनवधानाने फेरीवाला येऊन बसल्यास त्याला सूचना द्यावी. व्यापार्‍यांनी दुकानातील विक्रीचा माल दुकानाबाहेर मांडू नये. जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून आलेल्या सूचनांचे पालन करावे.


नियम पाळा

रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिर संस्थेने गर्दी व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फक्त रुढी परंपरेनुसार मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्याचे ठरवले आहे. मुखदर्शनाला येणार्‍या भाविकांना मास्क, सॅनिटायझेशन व सुरक्षित अंतर असे नियम पाळावे लागतील.
 

काही लाखांची उलाढाल ठप्प !

कार्तिकीनिमित्त रत्नागिरीत होणार्‍या जत्रेत परजिल्ह्यातील अनेक विक्रेते येतात. यंदा यात्रेवर बंदी असल्याने विक्रेत्यांनी दुकान थाटल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. या जत्रेमध्ये असंख्य प्रकारच्या वस्तूंची विक्री केली जाते. त्यातून काही लाखांची उलाढाल होते. मात्र जत्रा नसल्याने यंदा सर्वांचा हिरमोड झाला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT