this year the rice rate is rupees 2200 and rice centers also open in ratnagiri 
कोकण

यंदाचा भाता दर २२०० रुपये ; रत्नागिरीत भात खरेदी केंद्रे सुरु

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात आजपासुन भात खरेदी केंद्रे सुरू होणार असून भातासाठी २२०० रुपये दर निश्‍चित झाला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्‍यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे निश्‍चित केली आहेत. येथील बजाज राईस मिलमार्फतही थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे. उद्यापासून ही भात खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. भातासाठी २२०० रुपये दर देण्यात येणार आहे.

भाताची साठवणूक करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने २० हजार बारदाने जिल्ह्यात पाठविली आहेत. आमदार नाईक यांनी यावर्षी लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले होते. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व शासनस्तरावर त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील भात खरेदीसाठी भात खरेदी केंद्रे निश्‍चित केली आहेत.

शेतकऱ्यांकडून भात खरेदीची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. येथील बजाज राईस मिलने गत वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून भात खरेदी केले होते. त्यासाठी वेळ लागत होता. बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फत  भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी 
प्रयत्न केले होते. त्याला देखील मान्यता देण्यात आली आहे.आता  बजाज राईस मिलमाफत खरेदी केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील भात खरेदी केंद्रे

- कुडाळ तालुका ः कुडाळ , माणगाव, घोटगे, कडावल, कसाल, निवजे, पणदूर, पिंगुळी एमआयडीसी, आंब्रड, हिर्लोक, आरोस.
- मालवण ः पेंडूर, आचरा, चौके, कट्टा, विरण.
- सावंतवाडी ः सावंतवाडी शहर, मळगाव, मडूरा, तळवडे, डेगवे, कोलगाव, मळेवाड इन्सुली.
- दोडामार्ग ः दोडामार्ग शहर, भेडशी.
- वेंगुर्ले ः वेंगुर्ले शहर, शिरोडा, म्हापण, वेतोरे, तुळस.
- कणकवली ः कणकवली शहर, कनेडी, फोंडा, तळेरे,     खारेपाटण.
- देवगड ः देवगड शहर, पडेल, पाटगाव, शिरगाव.
- वैभववाडी ः वैभववाडी शहर, आचिर्णे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT