youth in konkan start a new project of electricity with help of solar project in ratnagiri 
कोकण

अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा उपयोग करत तरुण खेळवतोय २४ तास वीज

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : भौगोलिकदृष्ट्‌या अडचणीचा प्रदेश असलेल्या कोकणात अनेक ठिकाणी वीज पोचलेली नाही. यावर मात करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा उपयोग करीत घरात २४ तास वीज खेळवली आहे, तालुक्‍यातील फणसोप सडा येथील दीपराज पारकर या तरुणाने. गेली चार वर्षे सोलर, पवनचक्‍कीची वीज तो वापरत आहे. यावर पाण्याचा पंपच नव्हे, तर दगड फोडणारा ब्रेकरही चालवून त्याने घराचा परिसर स्वच्छ केला.

दीपराज बी. कॉम. झाला. फणसोप सडा येथील माळरानावर त्यांनी चार वर्षांपूर्वी जागा घेतली. तिथे महावितरणची वीज पोचण्यासाठी पावणेदोन लाखाचा खर्च अपेक्षित होता. तो परवडणारा नव्हता. जनरेटर घेणेही न परवडणारा. त्याने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतातून वीज निर्मितीचा चंग बांधला. त्यासाठी ऑनलाईन माहिती घेण्यास सुरवात केली. तीनशे वॅटचे सोलर पॅनल मागवले. वीज स्टोअरेजसाठी आवश्‍यक बॅटरी घेतली. त्याला २५ हजार रुपये खर्च आला. हेवी मशीन चालविण्यासाठी दोन हजार वॉटचा इर्न्व्हटर घेतला. त्याची जोडणीही स्वतःच केली. सोलरचे पॅनल बसवण्यासाठी ऋषीकेश कामतेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

पॅनल बसविल्यानंतर पहिला प्रयोग विहिरीवरील पंप चालविण्यासाठी केला. तो यशस्वी झाल्यानंतर लोड हळूहळू वाढवण्यासाठी सुरवात केली. घरात चोविस तास उजेड आणि फॅन सुरु झाला. दीपराज कॉम्प्युटरची कामे करीत असल्याने वीजेचा वापर अधिक. मिक्‍सर, फ्रिज, टीव्ही यासह पाणी खेचण्यासाठी एक एचपी पंपही त्यावर चालत आहे.

घराभोवतीचा कातळ फोडण्यासाठी ब्रेकर मशिन चालवले. त्याला १५०० वॉटची गरज लागते. तीही भागवली गेली. उन्हाळ्यात वीज मिळत होती; परंतु पावसाळ्यात अडचणी येऊ लागल्या. बॅटऱ्या व्यवस्थित चार्जिंग होत नव्हत्या. त्याला पर्याय म्हणून पवनचक्‍की उभारली. पुन्हा ऑनलाई सर्चिंग केले आणि १४ हजार ५०० रुपयांची पवनचक्‍की घेतली. तिचे फिटिंग दीपराज याने स्वतःच केले. मोकळा भाग असल्याने वारा चांगला असल्याने आवश्‍यक तेवढी वीजही मिळत आहे.

"एवढी वीज वापरल्यावर महिन्याला किमान वीजबिल ११०० रुपये आले असते. आतापर्यंतच्या खर्चात सोलर, पवनचक्‍कीतून २४ तास वीज मिळत असून, ‘महावितरण’ला द्यावयाचे पावणेदोन लाख वाचले. देखभाल दुरुस्तीचा खर्च नसल्याने पाच ते सात वर्षे ही वीज कायम मिळणार आहे."

- दीपराज पारकर, फणसोप सडा

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात मास्टरमाईंड बिजेंद्र गुप्ताला अटक

India's squad for the Asian Games 2026 : वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गेली, आता आशियाई सुवर्णपदकासाठी तयारी; भारतीय संघाची घोषणा

Women T-20 Worldcup : टी-२० रणनीतीच्या फेरविचाराची गरज; अमोल मुजुमदार

'देऊळ बंद २'नंतर मोहन जोशींची नवी इनिंग! 'अभया'मध्ये साकारणार दमदार भूमिका

SCROLL FOR NEXT