zilla parishad election ratnagiri political marathi news 
कोकण

कोकणात सभापतिपदासाठी सेनेचे दावेदार; पाचजण संधीच्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जि. प. वर शिवसेनेचे वर्चस्व आहे. सेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 39 सदस्य असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 15 सदस्य आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे समन्वयाचे धोरण स्वीकारले आहे. सर्वाना संधी मिळावी, यासाठी पक्षाने ठरवून दिलेली मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. कोरोनामुळे विद्यमानांना मुदतवाढ मिळणार, अशी चर्चा होती; परंतु दोनच दिवसांपूर्वी जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांनी पदाधिकारी बदल होणार असून, 25 फेब्रुवारीपर्यंत पदाधिकाऱ्यांचे राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. 

जि. प. विषय समिती सभापतींचा खांदेपालट निश्‍चित झाल्यामुळे इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. अध्यक्षपदासाठी अण्णा कदम यांच्यासह विक्रांत जाधव यांचे तर विविध समिती सभापती पदासाठी चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, स्वप्नाली पाटणे, पूजा नामे, रेश्‍मा झगडे यांची नावे चर्चेत आहेत. सेनेच्या 39 पैकी 34 सदस्यांना विविध पदांवर संधी मिळाली आहे. त्यात विषय समिती सभापतिपद आणि नियोजन समिती सदस्यत्व याचा समावेश आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पाचजणांना संधी दिली जाईल, अशी शक्‍यता आहे.

अध्यक्षपदासाठी 2 नावे चर्चेत 

अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम यांचे नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेल्या आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांचीही या पदासाठी वर्णी लागू शकते. उपाध्यक्ष किंवा शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांच्या नावाची चर्चा आहे. समाजकल्याण सभापतिपदी परशुराम कदम, महिला व बालकल्याण सभापती पूजा नामे, रश्‍मी जाधव तर बांधकाम समिती सभापती स्वप्नाली पाटणे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर यांचीही वर्णी लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

उदय बनेंचे काय? 
पाचवेळा जिल्हा परिषदेत निवडून आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने यांना शेवटच्या सव्वा वर्षात संधी दिली जाईल, असा अंदाज बांधला जात होता; परंतु जिल्ह्याच्या दक्षिण पट्ट्यातच अध्यक्षपद राहिल्यामुळे शेवटच्या टप्प्यात उत्तर भागातील सदस्यांना संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे बने यांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT