10th Olympic Games at age 55 Nino Salukvadze record first woman paris olympic 2024  sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : वयाच्या ५५व्या वर्षी दहावी ऑलिंपिक स्पर्धा; निनो सालुक्वाद्झे हिचा आगळा विक्रम, पहिलीच महिला

ऑलिंपिक स्पर्धेत नऊ वेळा सहभागी झाल्यानंतर आणि तीन पदके जिंकल्यानंतर निनो सालुक्वाद्झे हिने आपल्या पिस्तूलाचा निरोप घेण्याचे पक्के केले होते.

सकाळ वृत्तसेवा

शातोरु (फ्रान्स) : ऑलिंपिक स्पर्धेत नऊ वेळा सहभागी झाल्यानंतर आणि तीन पदके जिंकल्यानंतर निनो सालुक्वाद्झे हिने आपल्या पिस्तूलाचा निरोप घेण्याचे पक्के केले होते. तिने अभूतपूर्व अशा दहाव्या ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावी, अशी दिवंगत वडिलांची अखेरची इच्छा व्यक्त केल्यानंतर विचार बदलावा लागला.

आता वयाच्या ५५व्या वर्षी निनो सालुक्वाद्झे दहाव्यांदा ऑलिंपिकमध्ये सहभागी झाली असून पॅरिस स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ती जॉर्जियाची ध्वजधारक होती. दहा ऑलिंपिक स्पर्धांत सहभागी होणारी ती पहिली महिला असून घोडेस्वारीतील शो जंपर इयान मिल्लर याच्यानंतर दहा वेळा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणारी दुसरीच ॲथलीट ठरली आहे. जॉर्जियात ती आदर्शवत असून जागतिक क्रीडा बंधुत्वाची एक परिपूर्ण राजदूत मानली जाते.

१९८८ साली ऑलिंपिक पदके

निनो सालुक्वाद्झे हिने ऑलिंपिकमधील आपली पहिली दोन पदके १९८८ साली सोल ऑलिंपिकमध्ये पटकावली होती. तेव्हा तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण, तर १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. त्यावेळी तिने तत्कालीन सोव्हिएत युनियनचे प्रतिनिधित्व केले होते. २० वर्षांनंतर २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये जॉर्जिया देशाकडून खेळताना तिने ब्राँझपदकची प्राप्ती केली.

वडिलांच्या अखेरच्या इच्छेखातर

निनो हिला वडील व्हख्तांग सालुक्वाद्झे यांचे शब्द आठवले, जे तिला वडिलांची अखेरची इच्छा असल्यागत वाटले. त्यामुळे दहाव्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचा संकल्प झाला, असे तिने नमूद केले. वडिलांविषयी निनो म्हणाली, ‘‘त्यांनी माझ्याकडे कधीच काही मागितले नाही, त्यामुळे ती त्यांची शेवटची इच्छा असल्याचे मला वाटले.’’ ती शुक्रवारी २५ मीटर पिस्तूल प्रकारातील पात्रता फेरीत भाग घेणार आहे.

अजूनही ज्युनियर विश्वविक्रम नावावर

महत्त्वाची बाब म्हणजे, निनो सालुक्वाद्झे हिच्या नावे अजूनही ज्युनियर विश्वविक्रम आहे, जो तिने १९८९ साली नोंदविला होता आणि भारताच्या मनू भाकर हिने या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे. मनू हिने सध्या सुरू असलेल्या ऑलिंपिकमध्ये शानदार प्रदर्शन करताना १० मीटर एअर पिस्तूल व १० मीटर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात ब्राँझपदक जिंकले आहे.

अखेरच्या ऑलिंपिकचे संकेत

निनो सालुक्वाद्झे हिने पॅरिस ऑलिंपिक आपली अखेरची असल्याचे संकेत दिले आहेत. ती स्पर्धेचा आनंद लुटत आहे, तिला उजव्या डोळ्याची समस्या सतावत आहे. त्यामुळे आपण ऑलिंपिकचा निरोप घेण्याच्या वाटेवर असल्याचे निनो जाणून आहे. ‘‘टोकियोनंतर मला वाटले, की सारं संपले. माझे वडीच प्रशिक्षक होते. त्यांचे यावर्षी निधन झाले.

ते म्हणाले, ‘जर तू पुढे गेली नाहीस तर कदाचित तू रडशील.’ (टोकियो २०२० नंतर) चार वर्षे नव्हे, तर फक्त तीन वर्षे आहेत. यावर मी विचार केला, ठीक आहे, मी प्रयत्न करीन. आमचा खेळ खूपच मानसिक असल्याचे माझ्यासाठी ते खूपच चांगले प्रशिक्षक ठरले. आता माझ्या मनात फक्त स्पर्धेचाच विचार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT