olympics  e sakal
क्रीडा

Tokyo Olympics : 148 खेळाडूंनी घेतला कोरोना लशीचा पहिला डोस

सुशांत जाधव

Tokyo Olympics : टोकिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसह अन्य क्रीडा क्षेत्रातील 148 अ‍ॅथलेटिक्सनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाने यासंदर्भातील माहिती दिलीये. भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले की, 148 खेळाडूंपैकी 17 खिलाडूंनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले असून 131 खेळाडूंनी पहिला डोस (covid vaccine)घेतला आहे. 23 जूलैपासून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचाही यात समावेश आहे. (148 athletes mostly olympics bound across sports get covid vaccine first dose 17 fully vaccinated)

याच्याशिवाय टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या 13 खेळाडूंनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला असून यातील 2 खेळाडूंनी दोन्ही डोस घेतले आहेत. टोकियो पॅराऑलिम्पिक गेम्स 24 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 20 मेपर्यंत 163 खेळाडूंनी (पॅराऑलिम्पिकसह) किमान पहिला डोस घेतला आहे.

बत्रा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांसदर्भात माहिती देताना म्हटले की, 87 अधिकाऱ्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला गेला असून 23 अधिकाऱ्यांनी कोरोना लशीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. आतापर्यंत 90 भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळात टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. कोरोनामुळे जगातील मानाची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

भारतीय संघातील नेमबाज सध्या क्रोएशियामध्ये सराव करत आहेत. या खेळाडूंना याच ठिकाणी कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहीत भारतीय राष्ट्रीय रायफल संघाने (NRAI) दिली आहे. याच ठिकाणावरुन ते टोकियोला रवाना होणार आहेत. यातील काही खेळाडूंनी भारतातून क्रोएशियाला जाण्यापूर्वीच कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस ते तिथेच घेणार आहेत. तलवारबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी भवानी देवी सध्या इटलीमध्ये सराव करत आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू अमेरिकेत सराव करत असून ती याच ठिकाणी लस घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT