Novak Djokovic twitter
क्रीडा

19 वर्षांच्या पोरानं जोकोविचला दिली तगडी फाईट; पण...

सुशांत जाधव

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल असलेल्या नोवाक जोकोविच (Novak Djokovic) ने संघर्षमयी लढतीत विजय नोंदवत क्वार्टर फायनल गाठलीये. पहिले दोन सेट गमावल्यानंतर अनुभवाच्या जोरावर त्याने सुरेख कमबॅक केले. त्याने इटलीच्या लोरेंजो मुसेटी (Lorenzo Musetti ला पराभूत केले.

पहिल्या दोन सेटमध्ये नोवाक 6-7, 6-7 अशा फरकाने पिछाडीवर होता. तिसऱ्या सेटमध्ये सर्बियाच्या खेळाडूने गियर बदलला. पुढील दोन सेट त्याने 6-1, 6-0 अशा फरकाने जिंकले. निर्णायक सेटमध्ये त्याने 19 वर्षीय मोसेटीला 4-० असे मागे टाकले. युवा खेळाडूने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर जोकोविचला विनर घोषित करण्यात आले. जोकोविचची पुढची लढत ही इटलीच्या नवव्या मानांकित मातियो बेरेटिनी याच्या विरुद्ध रंगणार आहे.

पहिल्या दोन्ही सेटमध्ये निराशा पदरी पडल्यानंतर जोकोविचने अनुभवाच्या जोरावर सामना पुन्हा आपल्या बाजूने वळवला. चौथ्या सेटमध्ये इटलीच्या युवा टेनिसपटूने मेडिकल टाईम आउट घेतल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीने त्रस्त असलेल्या प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करत जोकोविचने सामन्यावरील पकड मजबूत केली.

जोकोविच दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनचा चॅम्पियन आणि 19 वे ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरला आहे. पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत जोकोविचच्या नावे 34 व्या विजयाची नोंद झालीये. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात 10 वेळा त्याला पराभवाचा सामनाही करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT