2023 badminton asia mixed team championships Lakshya Sen HS Prannoy PV Sindhu Akarshi Kashyap sakal
क्रीडा

Badminton Championships 2023 : भारताची सलामीची लढत कझाकस्तानशी

आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

दुबई : आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून (ता. १४) दुबई येथे सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सलामीलाच कझाकस्तानशी दोन हात करील. भारतीय संघाचा ब गटात समावेश करण्यात आला असून या गटात मलेशिया, संयुक्त अरब अमिराती या देशांचाही समावेश आहे.

कझाकस्तानविरुद्धच्या लढतीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या लढतीतही भारतावर दबाव येणार नाही. पण मलेशियाविरुद्ध खेळताना भारतीयांना सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. १७ देशांची चार गटांत विभागणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन देश थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहेत. १९ फेब्रुवारीला या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला होईल.

सिंधू, लक्ष्यवर मदार

या स्पर्धेमध्ये महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू व आकर्षी कश्‍यप हे खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करतील. तसेच पुरुष एकेरीत एच.एस.प्रणॉय व लक्ष्य सेन या दोघांवर भारताची मदार असणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विक रेड्डीच्या दुखापतीचा फटका भारताला बसू शकतो. सात्विकच्या अनुपस्थितीत चिराग शेट्टीसोबत दुहेरीमध्ये ध्रुव कपिला कोर्टवर उतरणार आहे. कृष्णा प्रसाद व विष्णूवर्धन गौड ही जोडीही पुरुषांच्या दुहेरीत सहभागी होईल. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली - गायत्री गोपीचंद, अश्‍विनी भट - शिखा गौतम या जोड्यांची निवड झाली आहे.

स्पर्धेची गटवारी

अ - चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, उझबेकीस्तान

ब - मलेशिया, भारत, कझाकस्तान, संयुक्त अरब अमिराती

क - इंडोनेशिया, थायलंड, बहरीन, सीरीया, लेबनन

ड - जपान, चीन तैपई, हाँगकाँग, पाकिस्तान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT