2024 Summer Olympics closing ceremony  Esakal
क्रीडा

Paris Olympics Closing Ceremony: टॉम क्रूझ अन् स्नूप डॉगने गाजवला ऑलिम्पिकचा सांगता सोहळा, पाहा झलक

Watch Video: या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश या समारंभात देशाचे ध्वजवाहक म्हणून सहभागी झाले होते.

आशुतोष मसगौंडे

क्रीडा स्पर्धांचा कुंभमेळा असलेल्या यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकचा सांगता सोहळा रविवारी रात्री रंगतदार शैलीत संपन्न झाला. स्टॅट डी फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या सांगता सोहळ्याला 205 देशांतील हजारो खेळाडूंनी हजेरी लावली.

भारताकडून या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश या समारंभात देशाचे ध्वजवाहक म्हणून सहभागी झाले होते.

70 हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पॅरिसच्या महापौर ॲन हिडाल्गो यांनी 2028 च्या यजमान अमेरिकन शहर लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरेन बास यांना ऑलिम्पिक ध्वज सुपूर्द केला. यासह चार वर्षांनंतर होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे काउंटडाऊन सुरू झाला आहे.

ऑलिम्पिक मशाल विझवून लिओन मार्चंडसह काही निवडक क्रीडापटूंसह बाख यांच्यासोबत तीन तास चाललेल्या या सोहळ्याची अधिकृतपणे सांगता केली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही उपस्थित होते.

यादरम्यान टॉम क्रूझ, बिली इलिश, स्नूप डॉग आणि डॉ. ड्रे यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आणि हा सोहळा संस्मरणीय बनवला.

एंजेल, कमिस्की आणि रॅपर ओनेडा यांनी फ्रेंच बँड फिनिक्सच्या परफॉर्मन्समध्ये सादरीकरण केले. त्याच वेळी, पाच वेळा ग्रॅमी विजेती गॅब्रिएला सार्मिएन्टो विल्सनने अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले.

पॅरिस ऑलिम्पिकच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यानंतर सांगता सोहळाही अप्रतिम झाला. सर्व 205 देशांच्या ध्वजधारकांनी स्टेट डी फ्रान्स स्टेडियमवर 70 हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर कोरलेल्या जगाच्या नकाशावर प्रदक्षिणा घातली. सर्व देशांचे खेळाडू प्रेक्षकांचे स्वागत करत स्टेडियमवर पोहोचले. यावेळी बहुतेक पदक विजेत्यांच्या गळ्यात पदके होती.

समारोप समारंभाची सुरुवात मार्सी पॅरिसने सुरुवात

सांगता समारंभाची सुरुवात 'मर्सी पॅरिस'ने झाली. जो एक फुगा होता. या फ्रेंच शब्दाचा अर्थ आभारी आहे असा होतो.पॅरिस ऑलिम्पिक चार सुवर्णपदके जिंकणार फ्रन्सा विजेता जलतरणपटू लिओन मर्चंडने समारोप समारंभात प्रवेश केला आणि ऑलिम्पिक मशाल पॅरिस स्टेडियममध्ये नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT