23-Year Title All England Badminton Starts Today Expectations from Sindhu Along with Satwik-Chirag Sakal
क्रीडा

All England Open 2024 : २३ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपणार?

ऑल इंग्लंड बॅडमिंटन आजपासून; सात्विक-चिरागसह सिंधूकडून अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : ऑल इंग्लंड बॅडमिंटन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला उद्यापासून (ता. १२) सुरुवात होणार आहे. प्रकाश पडुकोण यांनी १९८०मध्ये, तर पुलेला गोपीचंद यांनी २००१मध्ये ही स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली होती.

मात्र, त्यानंतर आता २३ वर्षे उलटून गेली तरीही भारताच्या एकाही खेळाडूला विजेतेपदावर मोहोर उमटवता आलेली नाही. भारतीय बॅडमिंटनपटू विजेतेपदाचा हा दुष्काळ यंदा संपवणार का, असा यक्षप्रश्‍न याप्रसंगी उभा ठाकला आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीकडून भारताला मोठ्या अपेक्षा असणार आहेत. या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेआधी तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीत मजल मारली होती; पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता भारताच्या या दिग्गज जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी आपली दावेदारी निश्‍चित केली आहे.

सिंधूसमोर खडतर आव्हान

भारताची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिला गुडघ्याच्या दुखापतीमुळे चार महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहावे लागले. फ्रेंच ओपन स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. तिच्याकडून भारताला आशा आहेत. मात्र, ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तिच्यासमोर अव्वल मानांकित ॲन सी यंग हिचे कडवे आव्हान असणार आहे.

सेन, प्रणोय, श्रीकांतवर मदार

भारताची पुरुषांच्या एकेरीतील मदार तीन खेळाडूंवर असणार आहे. लक्ष्य सेन, एच. एस. प्रणोय व किदांबी श्रीकांत या तीन खेळाडूंना चमकदार खेळ करावा लागणार आहे. लक्ष्यला दुसऱ्या फेरीत अँडर्स अँटोसेन याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. प्रणोय सलामीलाच चीन तैपईच्या सू लि यँगशी लढणार आहे. श्रीकांतला स्टार खेळाडू व्हिक्टर ॲक्सेलसेन याचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT