25th June 1983 World Cup Winner Indian Team Salary Given By BCCI  esakal
क्रीडा

1983 World Cup : इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला मिळाला होता किती पगार?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : जागतिक क्रिकेट वर्तुळात सध्या भारताची पत सर्वात जास्त आहे. भारतीय क्रिकेटने कामगिरीच्या पातळीवर आणि आर्थिक पातळीवर देखील मोठी मजल मराली आहे. असे असले तरी भारतीय क्रिकेट इतिहासात 1983 साली जिंकलेल्या वर्ल्डकपचे एक अनन्यसाधारण महत्व आहे. (25th June 1983 World Cup Winner Indian Team Salary Given By BCCI)

आजच्याच दिवशी म्हणजे 25 जून 1983 साली भारताने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर नाव कोरत इतिहास रचला होता. त्यानंतर आता भारतीय क्रिकेटने बरीच प्रगती केली आहे. आर्थिक दृष्ट्या आता बलाढ्य असलेल्या भारतीय क्रिकेटचा तो काळ मात्र पैशाच्या बाबतीत फारसा समृद्ध नव्हता. कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला त्यावेळी फक्त 2100 रूपये पगार मिळाला होता.

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 25 जून 1983 ला पहिला वर्ल्डकप जिंकला होता. आज भारतात क्रिकेट ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर जावून पोहचले आहे त्याची पायाभरणी ही 25 जून 1983 ला झाली होती. ज्यावेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला होता त्यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्वातील संघाकडून फार अपेक्षा केल्या जात नव्हत्या. मात्र भारताने फायनल गाठली आणि फायनलमध्ये त्याकाळच्या अत्यंत बलाढ्य अशा वेस्ट इंडिजला 43 धावांनी पराभूत करत इतिहास रचला.

या इतिहास रचणाऱ्या संघाला त्या काळी सामन्याचे मानधन म्हणून 1500 रूपये मिळायचे. तसेच प्रती दिवसाचा 200 रूपये भत्ता याप्रमाणे 600 रूपये मिळाले होते. म्हणजे त्यावेळी वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला बीसीसीआयने एकूण 2100 रूपये दिले होते. त्यानंतर बीसीसीआयने लता मंगेशकर यांचा कॉन्सर्ट ठेवून 20 लाख रूपयाचा फंड गोळा केला होता. यानंतर खेळाडूंना प्रत्येकी 1 लाख रूपये देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT