देवेंद्र झाझारिया  sakal
क्रीडा

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना निरोप

नऊ खेळांच्या प्रकारात ५४ खेळाडू सहभागी होत आहेत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑलिंपिक (olympic) स्पर्धेतील यशानंतर आता लक्ष लागून राहिलेल्या टोकियोतील पॅरालिंपिक (tokyo Paralympics ) स्पर्धेसाठी ५४ भारतीय खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाकडून निरोप देण्यात आला. हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून परततील, असा विश्वासही या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. नऊ खेळांच्या प्रकारात ५४ खेळाडू सहभागी होत आहेत. यात देवेंद्र झाझारिया (२००४ आणि २०१४ सुवर्णपदक), मरियप्पन थांगावेलू (उंच उडी) आणि जागतिक विजेता संदीप चौधरी (भालाफेक) यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

गतवेळेस रियोत झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत मरियप्पने सुवर्णपदक जिंकले होते. तो यंदा भारतीय पथकाचा ध्वजधारक असणार आहे. ही पॅरालिंपिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार लांबणीवर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडणार आहे. टोकियोत पॅरालिंपिक स्पर्धा सुरू होत आहे, त्यात भारतीय चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे आणि त्यांचाही सन्मान व्हावा म्हणून क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

पॅरालिंपिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत टोकियोत होत आहे. पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्याकरिता क्रीडा खात्याने जुलै महिन्यात समितीही नियुक्त केली आहे, परंतु ऑलिंपिकसह पॅरालिंपिक पदकविजेत्या खेळाडूंच्या निवडीसाठी हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याची मागणी या समितीने केली होती.

ऑलिंपिकप्रमाणे पॅरालिंपिक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून पदकविजेती कामगिरी अपेक्षित आहे, असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. पुरस्कार निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे काम अजून सुरू झाले नसल्याचीही माहिती ठाकूर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT