Doug Crowell twitter
क्रीडा

याला म्हणतात जोश; 91 व्या वर्षी पॅड बांधून उतरणार मैदानात

ज्या वयात माणसाला चालणंही कठीण असते त्या वयात पॅड बांधून कोणी मैदानात कशाला उतरेल?

सुशांत जाधव

क्रिकेटच्या मैदानात फार कमी वयात लक्षवेधी खेळी करुन चर्चेत आलेले खेळाडूंची अनेक नावे तुम्ही ऐकली असतील. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की 91 वर्षांच्या वयात एखादा माणूस क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची तयारी करतोय तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असेल? ज्या वयात माणसाला चालणंही कठीण असते त्या वयात पॅड बांधून कोणी मैदानात कशाला उतरेल? असा प्रतिप्रश्नही तुम्ही कराल. पण याच उत्तर एका व्यक्तीकडे आहे. कारण तो स्वत: वयाची नव्वदी पार केल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झालाय.

ऑस्‍ट्रेलियात वयोवृद्धांसाठी एक क्रिकेट लीग होते. वयाच्या तिशीनंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेलेले आणि वयाची साठी पार केलेली मंडळींसाठी ऑस्ट्रेलियात खास लीग भरवली जाते. या लीगमध्ये डग क्रोवेल (Doug Crowell) वयाच्या 91 वर्षी मैदानात उतरणार आहेत. जवळपास 15 वर्षे ते या लीगमध्ये खेळत आहेत. एबीसी न्‍यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, अजूनही क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहे. पुन्हा मैदानात उतरण्यासाठी स्वत:ला फिट ठेवले असून या वयात बॅट आणि चेंडू यांच्यातील ताळमेळ साधणे पूर्वीपेक्षा सोपे असते. चेंडू हळूवार बॅटवर येत असल्यामुळे शॉट सिलेक्शनसाठी वेळ मिळतो. जेव्हा माझी निवड होते तेव्हा तेव्हा मी क्रिकेटचा पूर्ण आनंद घेऊन खेळण्यास तयार असतो, असेही ते म्हणाले.

डग क्रोवेल (Doug Crowell) पुढे म्हणाले की, 'आम्ही कठीण परिस्थितीत क्रिकेट खेळायला शिकलो. आमच्यासाठी सर्वोत्तम मैदानाचा अभाव आहे. मैदान करण्यासाठी आवश्यक उपकरणही आमच्याकडे नव्हती. या परिस्थितीत खेळताना खूप तयारी करावी लागायची. कठोर परिश्रमामुळे आजही फिट असून खेळण्यासाठी उत्सुक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 1946 मध्ये त्यांनी विंटन क्रिकेट क्‍लब तयार केला. कठीण परिस्थितीत खेळल्याचा फायदा झाला. त्यामुळेच इतक्या वयानंतरही खेळू शकतो, असे ते मानतात. फिटनेससाठी ते आठवड्यातून तीन वेळा टेनिस खेळण्यावरही भर देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेत प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रिलॅक्स झोन’ची सुरूवात

SCROLL FOR NEXT