Wrestler Attack X
क्रीडा

Wrestler Attacked: धक्कादायक! अ‍ॅकेडमीमध्ये घुसून कुस्तीपटूंना 20 जणांच्या गटाकडून मारहाण, CCTV मध्ये घटना कैद

Wrestler Attacked: कुस्तीपटूंना अ‍ॅकेडमीमध्ये घुसून मारहाण करण्याची धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये घडल्याचे समोर आले आहे.

Pranali Kodre

Gurugram Wrestler Attacked: गुरुग्राममध्ये एक धडकी भरवणारी घटना एका स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीमध्ये घडली आहे. एका गटाने येऊन काही कुस्तीपटूंना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंगळवारी (9 एप्रिल) सकाळी 6 वाजता ही घटना घडली.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोकांमध्ये हाणामारी होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ज्यांना मारहाण झाली आहे, ते कुस्तीपटू असल्याचे समजत आहे.

दरम्यान, या घटनेमध्ये एक नॅशनल स्थरावरील कुस्तीपटूसह सात कुस्तीपटू जखमी झाल्याचे समजले आहे. हे खेळाडू अ‍ॅकेडमीममध्ये सराव करत होते. जखमी झालेल्या खेळाडूंना सरकारी आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. यातील काही खेळाडूंचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्याचेही समोर आले आहे.

गुरुग्राममधील खेडरी दौला पोलीस स्टेशनमध्ये या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

मीडियातील रिपोर्टनुसार एफआयआरमध्ये नॅशनल स्तरावरील कुस्तीपटू लोकेश याने माहिती दिली आहे की तो त्याच्या घरून अ‍ॅकडमीच्या दिशेने येत असताना दोन व्यक्तींनी त्याची वाट अडवली.

त्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर काही लोक अ‍ॅकेडमीमध्ये आले आणि त्यांनी कुस्तीपटूंना मारहाण केली. आता सध्या या प्रकरणाची तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT