Aakash Chopra Criticize BCCI Not Playing Mohammed Shami In Asia Cup
Aakash Chopra Criticize BCCI Not Playing Mohammed Shami In Asia Cup esakal
क्रीडा

Aakash Chopra : गंभीर चूक झाली! चोप्राने BCCI वर केले मोठे आरोप

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami : जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकप खेळणार नसल्याची घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली. मात्र या घोषणेवेळी बुमराहची रिप्लेसमेंट कोण असणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवले. यावरून चाहते, माजी क्रिकेटपटू बीसीसीआय आणि निवडसमितीवर टीका करत आहेत आता समालोचक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्राने देखील याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

आकाश चोप्राने ट्विट केले की, 'जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे वेस्ट इंडीज दौरा आणि आशिया कपमधून बाहेर राहिला. जर टी 20 क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी जर जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट असेल तर त्याने आशिया कप खेळणे अत्यंत गरजेचे होते. टीम इंडिया आशिया कपमध्ये तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली. याचा परिणाम संघाला भोगावा लागला.'

गोलंदाजीत भारतीय संघाला जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यासारखी गुणवत्ता असलेला दुसरा गोलंदाज नाही. दीपक चाहर आणि मोहम्मद शमी त्याचा पर्याय म्हणून समोर येतात तर शमीच्या फिटनेसबाबत साशंकता अजूनही कायम आहे. चाहर हा भुवनेश्वर टाईप बॉलर आहे. वर्ल्डकपसाठी संघ रवाना होणार असतानाही बीसीसीआयने अजून बुमराहचा पर्याय कोण याचे उत्तर दिलेले नाही.

बॉलिंग कॉम्बिनेशनचा विचार केला तर निवडसमितीने एकूण तीन फिरकीपटूंची निवड केली आहे. यात आर. अश्विन, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग हे तीन गोलंदाज असतील. जसप्रीत बुमराहची जागा कोण घेणार याचा अजून निर्णय झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सून होणार दाखल

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT