Aakash Chopra India Squad Based On IPL 2022 Performance Rohit Sharma Virat Kohli not teams  sakal
क्रीडा

आकाश चोप्राच्या प्लेइंग इलेव्हनमधून हीट मॅन अन् विराटला डच्चू

उद्या T20 वर्ल्डकप झाला तर... असा असेल आकाश चोप्राची प्लेइंग इलेव्हन.

Kiran Mahanavar

Aakash Chopra India Squad Based On IPL 2022: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टी-20 विश्वचषक जर उद्या सुरु झाले तर अशा परिस्थितीची कल्पना करत भारतीय संघ निवडला आहे. आयपीएल 2022 नुकतंच संपलं आहे, त्याच्या आधारे त्याने भारतीय संघ निवडला आहे. त्यांच्या संघात कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत या मोठ्या नावांना स्थान देण्यात आले नाही.

आयपीएल 2022 मध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना त्याच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. रोहितने 14 सामन्यात फक्त 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या तर विराट कोहलीने 16 सामन्यात 341 धावा केल्या आणि ऋषभ पंतलाही काही खास करता आले नाही त्याने 14 सामन्यांत 30.91 च्या सरासरीने 340 धावा केल्या.

आकाश चोप्राने यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओ सोडला आहे. व्हिडिओमध्ये आकाश चोप्रा म्हणाला, आपण फक्त असे कल्पना करू की, T20 विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू न होता उद्यापासून चालू होईल. अश्या वेळेस आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर आपण भारतीय संघ निवडत आहे. चोप्राने त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत या मोठ्या दिग्गज खेळाडूची नावे नाहीत.

चोप्राने निवडलेले खेळाडूचा संघ - के.एल राहुल, ईशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, आवेश खान, कुणाल पांड्या, संजू सॅमसन, अर्शदीप सिंघ, दीपक हुड्डा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT