aakash chopra Say Rahul Tripathi not international debut in Ireland T20Is  
क्रीडा

'मला वाटत नाही तो पदार्पण करेल...' आकाश चोप्राची पुन्हा एकदा भविष्यवाणी

दक्षिण आफ्रिका मालिकेत ज्या खेळाडूंना संधी मिळू शकली नाही ते खेळाडू आयर्लंड मालिकेत खेळतील?

Kiran Mahanavar

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. भारताला यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंडचा दौरा करायचा आहे, जिथे फक्त दोन टी-20 सामने खेळायचे आहेत. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली असून त्यात राहुल त्रिपाठीच्या (Rahul Tripathi) नावाचाही समावेश करण्यात आला आहे. राहुल त्रिपाठीचे नाव संघात असले तरी आयर्लंड दौऱ्यावरही पदार्पण करणे कठीण असल्याचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला (Aakash Chopra) वाटते.

दक्षिण आफ्रिका मालिकेत ज्या खेळाडूंना संधी मिळू शकली नाही. ते खेळाडू आयर्लंड मालिकेत खेळतील, असा विश्वास आकाश चोप्राला वाटतो. राहुल त्रिपाठी प्लेइंग 11 मध्ये खेळण्याबाबत प्रश्न विचारला असता आकाश चोप्रा म्हणाला की संघात आधीच 9 फलंदाज असल्याने हे अवघड आहे. दीपक हुड्डाला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत संधी मिळाली नाही, त्यामुळे राहुलला संधी मिळणे कठीण आहे.

31 वर्षीय राहुल त्रिपाठी आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या आयपीएल हंगामात त्याचा स्ट्राइक रेट मजबूत होता. IPL 2022 मध्ये राहुल त्रिपाठीने 14 सामन्यात 413 धावा केल्या आहे. आफ्रिका मालिकेसाठी त्याचे नाव आले नाही, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले पण त्याला आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश केला आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया: हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

Acute Encephalitis Syndrome: उपराजधानीला मेंदूज्वराचा धोका; शहरात आढळले ८ रुग्ण, मनपाच्या रूग्णालयात उपचाराच्या यंत्रणेचा अभाव

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

SCROLL FOR NEXT