Aaron Finch Bhuvneshwar Kumar esakal
क्रीडा

Aaron Finch Bhuvneshwar Kumar : 15 वर्षं हे थांबवण्याचा प्रयत्न केला.... फिंचचे भुवनेश्वर कुमारबद्दलंच 'ते' वक्तव्य होतंय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Aaron Finch Bhuvneshwar Kumar : ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप विजेता कर्णधार एरॉन फिंचने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र निवृत्तीनंतरही एरॉन फिंचचा भुवनेश्वर कुमार पिच्छा सोडत नाहीये. फिंच हे ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांमधील एक मोठं नाव आहे. मात्र त्याला भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंगवर चांगलंच झुलवलं होतं.

फिंच हा ऑस्ट्रेलियाचा एक माजी धडाकेबाज फलंदाज आहे. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. सलामीला येत पॉवर प्लेमध्ये चौकार आणि षटकारांची बरसात करायचा. मात्र ज्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार समोर यायचा त्यावेळी फिंचची बॅट अचानक शांत व्हायची. त्याला भुवनेश्वर कुमारची स्विंग गोलंदाजी खेळणे अवघड जात होते.

दरम्यान, निवृत्तीनंतर एरॉन फिंच एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात चाहत्याने भुवनेश्वरबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी फिंचने प्रांजळपणे उत्तर दिले.

चाहत्याने विचारलं की, 'मी तुझा मोठा चाहता आहे. तुला भुवनेश्वर कुमार एवढं का सतावत होता. तुझं फुटवर्क चांगलं नव्हतं का?'

यावर ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने प्रतिक्रिया दिली की, 'मी हे 15 वर्षं रोखण्यांचा प्रयत्न करत होतो.' भुवनेश्वर कुमारने फिंचला सातवेळा बाद केलं आहे. 2019 च्या एका ऑस्ट्रेलिया - भारत मालिकेत भुवीने फिंचला चारवेळा बाद केलं होतं.

फिंचने ऑस्ट्रेलियाचे 76 टी 20 सामन्यात तसेच 55 वनडे सामन्यात नेतृत्व केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाचे 254 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं. यात 5 कसोटी, 146 वनडे आमि 103 टी 20 सामने खेळले आहेत. फिंचने इंग्लंविरूद्धच्या 2011 च्या टी 20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्याने 8804 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. त्याने 17 वनडे तर 2 टी 20 शतके ठोकली आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT