Aaron Finch 
क्रीडा

Aaron Finch Video : कांगारूंच्या कॅप्टनला शिव्या देणं पडलं महागात, टी-20 वर्ल्डकपमध्ये टांगती तलवार

ॲरॉन फिंचने अंपायरसमोर केली शिवीगाळ, ICC ने सुनावली शिक्षा

Kiran Mahanavar

Aaron Finch T20 World Cup : टी-20 विश्वचषकापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसू शकतो. पर्थमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲरॉन फिंचला दंड ठोठावण्यात आला आहे. फिंच आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.

आयसीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार इंग्लंडच्या डावाच्या 9व्या षटकात ॲरॉन फिंचने अंपायरसमोर अपशब्द वापरले. या कारणास्तव ॲरॉन फिंचला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. ॲरॉन फिंचने हे आरोप मान्य केले असून यासंदर्भात त्याच्या शिस्तबद्ध रेकॉर्डमध्ये एक मुद्दा नोंदवण्यात आला आहे. म्हणजेच भविष्यात त्याने असे काही केल्यास त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲरॉन फिंचची गेल्या दोन वर्षात ही पहिली चूक आहे. तरीही त्याला धोका आहे, कारण आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये चार गुण वजा झाल्यास त्या खेळाडूवरही बंदी घातली जाऊ शकते. म्हणजेच ॲरॉन फिंचने त्याच्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास तो इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतून किंवा T20 विश्वचषकातूनही बाहेर होऊ शकतो.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत अजून दोन टी-20 सामने बाकी आहेत. या मालिकेतील पहिला सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व आरोन फिंच करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे.

वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :

ॲरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, मार्कस स्टोयनिस, एश्टन एगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क आणि एडम जाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT