aaron finch takes selfie with captains
aaron finch takes selfie with captains sakal
क्रीडा

T20 World Cup 2022 : चल बेटा सेल्फी लेले रे... आरोन फिंचच्या कॅमेरात 16 कर्णधार कैद

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : आता टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. पहिल्या फेरीचे सामने 16 ऑक्टोबरपासून सुरू होतील. याआधी सर्व 16 संघांचे कर्णधार विश्वचषक ट्रॉफीसह एका फ्रेममध्ये दिसले. आयसीसीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचनेही सर्व कर्णधारांसोबत सेल्फी काढला आहे.

पहिल्या फोटोत गेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे कर्णधार ट्रॉफीच्या अगदी जवळ बसले आहेत. या दोन कर्णधारांच्या मागेच गेल्या वेळच्या उपांत्य फेरीतील पाकिस्तान आणि इंग्लंडच्या कर्णधारांना स्थान मिळाले आहे. फोटोत डावीकडे भारतीय कर्णधार रोहित शर्मा बसला दिसत आहे. आयसीसीने अॅरॉन फिंचने घेतलेला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा फिंचच्या मागे उभा दिसत आहे. सर्व कर्णधारांच्या चेहऱ्यावर हास्य आहे.

नामिबिया विरुद्ध श्रीलंका सामन्याने रविवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता टी-20 विश्वचषकाची सुरुवात होईल. यानंतर लगेचच नेदरलँडचा संघ यूएईशी भिडणार आहे. 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान 8 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या 8 पैकी 4 संघ सुपर-12 फेरीत प्रवेश करतील. सुपर-12 मध्ये आधीच 8 संघ आहेत. सुपर-12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT