ODI World Cup 2023 Virat Kohli batting position AB de Villiers 
क्रीडा

ODI WC23 : 'भारतासाठी वर्ल्ड कपमध्ये विराटला तिसऱ्या क्रमांकावर नाही तर...' कोहलीबद्दल डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

ODI World Cup 2023 Virat Kohli batting position AB de Villiers : एकदिवसीय वर्ल्ड कप आणि आशिया कप 2023 च्या तयारीत असलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोरील सर्वात मोठी समस्या चौथ्या क्रमांकाची आहे. अलीकडच्या काळात श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडत असताना टीम इंडियाकडे चौथ्या क्रमांकावर एकही फलंदाज नसल्याची चर्चा जोर धरू लागली होती.

चौथ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज हा मधल्या फळीतील महत्त्वाचा दुवा असतो, जो परिस्थितीनुसार डाव हाताळतो आणि गरज पडेल तेव्हा झटपट धावा करण्याचे कामही करतो. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले.

श्रीलंकेतील कॅंडी येथे 2 सप्टेंबर रोजी आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली 2023 आशिया कप आणि वर्ल्ड कप स्पर्धेसाठी चौथा क्रमांक योग्य आहे. तो डाव हाताळू शकतो आणि मधल्या फळीत कोणत्याही प्रकारची भूमिका बजावू शकतो.

तो पुढे म्हणाला की, कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल की नाही याची मला खात्री नाही. पण जर संघाला त्याची गरज आहे मग त्याला ते करावे लागेल. कोहलीने वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत 39 सामन्यांत 1767 धावा केल्या आहेत आणि सरासरी 55.62 आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या माजी कर्णधाराने 2023 आशिया कप जिंकण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन आवडत्या संघांची निवड केली. भारताने सर्वाधिक सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, तर पाकिस्तानने दोन वेळा आशिया कप जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT