Sri Lanka vs Pakistan 2nd Test esakal
क्रीडा

Sri Lanka vs Pakistan : चर्चा बॅझबॉलची नाही तर पाकबॉलची! लंकेत मोठा धमाका, मालिकेवर पकड केली मजबूत

अनिरुद्ध संकपाळ

Sri Lanka vs Pakistan 2nd Test : पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कोलंबो येथे दुसरा कसोटी सामना खेळत आहे. सहसा श्रीलंकेत श्रीलंकेला पराभूत करणं तितकं सोपं नसतं. मात्र पाकिस्ताने पहिली कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीत देखील आपला दबदबा निर्माण केला आहे.

तिसऱ्या दिवस अखेर पाकिस्तानने पहिल्या डावात 5 बाद 563 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यांनी पहिल्या डावात 397 धावांची मोठी आघाडी घेतली असून अजून त्यांनी आपला पहिला डाव घोषित केलेला नाही.

पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव 166 धावात गुंडाळला होता. त्यानंतर दुसरा दिवशी पासामुळे फारसा खेळ झाला नाही. मात्र तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी फलंदाजांनी धमाकाच केला. पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफिकने (Abdullah Shafique) 326 चेंडूत 201 धावांची द्विशतकी खेळी केली. शान मसूदने 51 तर सौद शकीलने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.

मात्र सर्वात दमदार खेळी ही मधल्या फळीतील आगा सलमानने (Agha Salman) केली. त्याने फक्त 148 चेंडूत 132 धावांची नाबाद खेळी करत सलामीवीर शफिकसोबत पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी रचली.

या भागिदारीमुळे पाकिस्तानने 500 धावांच्या जवळपास पोहचला. यानंतर सलामीवीर शफिक बाद झाल्यानंतर सलमानने मोहम्मद रिझवानसोबत सहाव्या विकेटसाठी नाबाद 95 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानला दिवसाचा खेळ संपेपर्यंत 563 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT