Women Asia Cup 2023  
क्रीडा

Women Asia Cup 2023: भारताच्या वाघिणींनी जिंकला आशिया कप! अंतिम फेरीत बांगलादेशला चारली पराभवाची धूळ

Kiran Mahanavar

Women's Emerging Asia Cup 2023 : महिला इमर्जिंग आशिया कप 2023च्या अंतिम फेरीत भारत अ ने बांगलादेश अ संघाचा पराभव केला. टीम इंडियाने हा सामना 31 धावांनी जिंकून विजेतेपदाचा सामना जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 गडी गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 96 धावांत ऑलआऊट झाला.

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ फलंदाजीसाठी उतरला. डावाची सुरुवात करणाऱ्या कर्णधार श्वेता सेहरावत आणि उमा छेत्री या जोडीने केवळ 28 धावांची भर घातली. मात्र यानंतर कनिका आहुजाच्या 30 धावा आणि वृंदा दिनेशच्या 36 धावांच्या जोरावर संघाला 20 षटकात 127 धावा करता आल्या. बांगलादेशकडून सुलताना खातून आणि नाहिदा अख्तरने 2-2 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 19.2 षटकांत 96 धावा करत सर्वबाद झाला. बांगलादेशच्या डावात फक्त 3 फलंदाज होते जे दुहेरी आकडा पार करू शकले. टीम इंडियाच्या विजयाची हिरो ठरली श्रेयंका पाटील. श्रेयंकाने 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी घेतले. त्याचवेळी मन्नत कश्यपने 3 आणि कनिका आहुजाने 2 विकेट्स घेतल्या.

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होणार होता. मात्र पावसामुळे सामना वाहून गेला आणि महिला संघाने लीग टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, बांगलादेश संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

Sagar Mali Bodybuilder Death : जगाला ताकद दाखवली पण..., आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सागर माळी यांचे निधन, मृत्यूचे धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : पुण्यातील माणिक बागेत अपघात; युवतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT