Achinta Sheuli Won Gold Medal 
क्रीडा

CWG 2022 : भारताचा सुवर्णपदकाचा ट्रिपल बार, अर्चिता शेउलीची वेटलिफ्टिंगमध्ये पदक

अचिंता शिऊलीने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले तिसरे सुवर्ण पदक

Kiran Mahanavar

Achinta Sheuli Won Gold Medal: भारतीय वेटलिफ्टर अचिंता शिउली बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. यासह भारताने सहावे पदक जिंकले आहे. अचिंताने स्नॅच राऊंडमध्ये 143 किलो आणि क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 170 किलोसह एकूण 313 किलो वजन उचलत ही सुवर्ण कामगिरी केली.

भारतीय वेटलिफ्टर अचिंता शिउली बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अचिंता शिउलीने पहिल्या लिफ्टमध्ये 137 किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये 140 किलो वजनाचा भार त्याने उचलला. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले.

अचिंता शेउलीला क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात 166 किलो वजन उचलण्यात यश आले. अचिंता शेउलीने यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 170 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने पुन्हा 170 किलो वजन उचलत स्वतःचा विक्रम केला.

ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. बिंदियारानी देवीने महिलांच्या 55 किलो वजनी गटात आणि संकेत सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. यानंतर भारताचा युवा सेन्सेशन जेरेमी लालरिनुंगा याने 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 131 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Latest Marathi News Update : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT