Adam Gilchrist IPL 2022 salal
क्रीडा

IPL फ्रँचायजींची जगभरात 'दादागिरी', गिलख्रिस्टने केली टिका

गिलख्रिस्ट; डेव्हिड वार्नरच्या ‘यूएई’ लीगमध्ये खेळण्यावरून टिपण्णी

सकाळ ऑनलाईन टीम

Adam Gilchrist IPL : ऑस्ट्रेलियाचा माजी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने जागतिक क्रिकेटमधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायजींच्या वाढत्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांची सध्याची ‘मक्तेदारी’ची प्रवृत्ती धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर या हंगामात बिग बॅश लीग (बीबीएल) मधून बाहेर पडून त्याऐवजी अधिक फायदेशीर ‘यूएई टी-२०’ लीगमध्ये खेळू शकतो, या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर गिलख्रिस्टने ही टिप्पणी केली आहे.

विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्स, कोलकता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन आयपीएल फ्रँचायजींनी ‘यूएई टी-२०’ लीगमधील संघांमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘‘डेव्हिड वॉर्नरला बीबीएलमध्ये खेळण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. मला हे समजते. यात केवळ वॉर्नरच नाही तर इतर खेळाडूंचाही सहभाग असेल याचीही मला कल्पना आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमधील अनेक संघांचे मालक असलेल्या आयपीएल फ्रँचायजींची ही जागतिक मक्तेदारी आहे,’’ असे गिलख्रिस्टने यावेळी म्हटले आहे.

गिलख्रिस्ट पुढे म्हणाला, ‘‘हा काहीसा धोकादायक ट्रेंड आहे, जो खेळाडूंची मालकी आणि त्यांच्या प्रतिभेवर, ते कुठे खेळू शकतात व कुठे खेळू शकत नाहीत यावर एकप्रकारे मक्तेदारी व्यक्त करण्याशी संबंधित आहे.’’

ऑस्ट्रेलियासाठी ९६ कसोटी आणि २८७ एकदिवसीय सामने खेळणारा गिलख्रिस्ट यापूर्वी डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांसारख्या आयपीएल संघांसाठी खेळला आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले तेव्हा गिलख्रिस्ट संघाचा कर्णधार होता.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सल्ला

भविष्यात इतर अनेक क्रिकेटपटू देखील वॉर्नरच्या मार्गाचा अवलंब करू शकतात, त्यामुळे गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला या प्रकरणात लक्ष घालण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, ‘‘जर वॉर्नर ‘सॉरी ऑस्ट्रेलियन क्रिकेट, मी माझ्या भारतीय फ्रँचायजी संघांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार आहे,’ असे म्हणाला तर तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकत नाही, कारण तो त्याचा विशेषाधिकार आहे. त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बाजारपेठेतील ब्रँड मूल्य वाढविलेले आहे. परंतु उपाययोजना करून हे सर्व थांबविणे आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT