Aditya Birla Capital  sakal
क्रीडा

Aditya Birla Capital : भारतीय ऑलिंपिक संघाचे आदित्य बिर्ला कॅपिटल पुरस्कर्ते

यावर्षीच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संघाचे अधिकृत पुरस्कर्ते म्हणून आदित्य बिर्ला कॅपिटल लि.ने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनबरोबर भागीदारी जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : यावर्षीच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संघाचे अधिकृत पुरस्कर्ते म्हणून आदित्य बिर्ला कॅपिटल लि.ने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनबरोबर भागीदारी जाहीर केली आहे. आदित्य बिर्ला कॅपिटल लि. ही आदित्य बिर्ला समूहाची कंपनी आहे.

समाज तसेच व्यक्ती यांच्या सक्षमीकरणासाठी आदित्य बिर्ला कॅपिटल करीत असलेल्या प्रयत्नांना ही पावती असल्याचे या भागीदारीमुळे मानले जात आहे. आयुष्य समृद्ध करत एकजुटीने विजय मिळवूया, हे आदित्य बिर्ला कॅपिटलचे घोषवाक्य आहे. आदित्य बिर्ला हे आर्थिक क्षेत्रातील विश्वासार्ह नाव असून विविध वयोगटातील लक्षावधी लोकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे आणि महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

क्रीडा स्पर्धांमध्येही बदल घडवण्याची मोठी ताकद आहे. भारतातील तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी क्षमता असल्याने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे आदित्य बिर्ला कॅपिटलचे धोरण आहे, असे कंपनीच्या सीईओ विशाखा मुळ्ये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT