Afghanistan Batter Smashed 7 Sixes In An Over 
क्रीडा

Video : एक ओव्हर, 7 षटकार अन् 48 धावा...! 'या' फलंदाजाने क्रिकेट विश्वात उडवली खळबळ

Kiran Mahanavar

Afghanistan Batter Smashed 7 Sixes In An Over : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा 21 वर्षीय डावखुरा फलंदाज सेदिकुल्लाह अटलने एका षटकात 7 षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. काबूल प्रीमियर लीगमध्ये गोलंदाज अमीर झझाई याच्याविरुद्ध सेदीकुल्लाने हा पराक्रम केला.

शाहीन हंटर्स आणि अबसिन डिफेंडर्स यांच्यातील सामन्यात शाहीन हंटर्सकडून खेळणाऱ्या सेदीकुल्लाने संघाला संकटातून तर बाहेर काढलेच, शिवाय सामना जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सेदीकुल्ला या सामन्यात फलंदाजीसाठी आला, तोपर्यंत शाहीन हंटर्स संघाने 16 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. येथून एका टोकापासून सेदीकुल्लाहने संघाचा डाव पुढे नेत 56 चेंडूंत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 118 धावांची नाबाद खेळी करत डावाच्या शेवटपर्यंत खेळला.

हंटर्सच्या डावातील 19व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या अमीर जाझाईला शाहीनने सलग 7 षटकार ठोकले. अमीर जझाईने त्याच्या षटकात एकूण 48 धावा दिल्या. सेदीकुल्लाहच्या या खेळीच्या जोरावर शाहीन हंटर्स संघाने 206 धावा केल्या आणि नंतर हा सामना 92 धावांनी जिंकला.

ऋतुराज गायकवाड यांनीही केला हा पराक्रम

तसेच महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका षटकात सात षटकार मारले. त्याने विजय हजारे ट्रॉफी सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात नो बॉलसह 7 षटकार ठोकले. हा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT