Afghanistan Restrict Australia In 168 Runs
Afghanistan Restrict Australia In 168 Runs  esakal
क्रीडा

AUS vs AFG : अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाची केली गोची; सेमी फायनलचे गणित केले अवघड

अनिरुद्ध संकपाळ

Afghanistan vs Australia T20 World Cup 2022 : अफगाणिस्तानने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 8 बाद 168 धावा रोखत यजमानांची मोठी गोची केली आहे. आता ऑस्ट्रेलियाला इंग्लंडचे नेट रनरेट पार करण्यासाठी अफगाणिस्तानला 106 धावात रोखावे लागणार आहे. तरच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलची काही आशा उरते. दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने चांगला मारा करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने 3 तर फजलहक फारूकीने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 54 धावांची खेळी केली तर मिचेल मार्शने 45 धावांचे योगदान दिले.

नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने आजच्या करो या मरो सामन्यात कर्णधारासह तीन बदल केले. मात्र या बदलांचा फारसा उपयोग झाला नाही. अफगाणिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचे रथीमहारथी एका पाठोपाठ एक धारातीर्थी पडत होते. सलामीवीर कॅमेरून ग्रीन 3 तर डेव्हिड वॉर्नर 25 धावांची भर घालून माघारी परतला.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अफगाणिस्तानविरूद्ध मोठी धावसंख्या उभरण्यासाठी धडपड करताना दिसत होते. मिचेल मार्शने आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 45 धावा केल्या. मात्र त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दरम्यान, स्मिथ 4 तर स्टॉयनिस 25 धावांची भर घालून बाद झाला. यामुळे ऑस्ट्रेलियाला भागीदारी रचण्यात अपयश आले. कर्णधार मॅथ्यू वेड देखील 6 धावा करून बाद झाला.

एकट्या ग्लेन मॅक्सवेलने एकाकी किल्ला लढवत 32 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली. अखेर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 8 बाद 168 धावात रोखले. अफगाणिस्तानकडून वेगवान गोलंदाज नवीन उल हकने 3 तर फजलहक फारूकीने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. मुजीब आणि राशिद खानने देखील प्रत्येकी 1 विकेट घेत हातभार लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT