Afghanistan vs Pakistan Rahmanullah Gurbaz esakal
क्रीडा

AFG vs PAK : अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यातील अपमानाचा बदला दुसऱ्या सामन्यात घेतला; पाकला सलामीवीरांनीच ठोकून काढलं

अनिरुद्ध संकपाळ

Afghanistan vs Pakistan Rahmanullah Gurbaz : आशिया कप आणि वर्ल्डकपपूर्वी तयारी म्हणून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात श्रीलंकेत तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला 59 धावात गुंडाळले होते. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 142 धावांनी अपमानजनक असा पराभव झाला होता.

मात्र या अपमानाचा त्यांनी दुसऱ्या सामन्यात चांगलाच बदला घेतला. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलामीवीर रहमनुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरान यांनी तब्बल 227 धावांची सलामी दिली. यात इब्राहिमने 80 धावांचे तर रहमनुल्ला गुरबाजने नाबाद 135 धावांचे योगदान दिले.

पाकिस्तानच्या गोलंदाजांचा कस पाहणाऱ्या गुरबाज आणि झादरान जोडीला अखेर उसमा मीरने ब्रेक लावला. मात्र यासाठी 40 वे षटक उजाडावे लागले. गुरबाजने तर पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा निम्मा संघ गारद करणाऱ्या हारिस रौऊफची चांगलीच धुलाई केली. त्याने 37 व्या षटकात त्याला सलग चार चौकार मारले.

रहमनुल्ला गुरबाजने 151 चेंडूत 151 धावांची दीडशतकी खेळी केली. अफगाणिस्तानने 50 षटकात 5 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने दोन विकेट्स घेतल्या तर नसीम शाह आणि उसमा मीर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 201 धावा केल्या होत्या. मात्र त्याच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 59 धावात गारद झाला होता. पाकिस्तानकडून हारिस रौऊफने 6.2 षटकात फक्त 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. शाहीन आफ्रिदीने 4 षटकात 2 विकेट्स घेतल्या.

अफगाणिस्तानचे 4 फलंदाज हे भोपळाही फोडू शकले नव्हते. अफगाणिस्तानकडून दोनच फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला. सलामीवीर रहमनुल्ला गुरबाजने सर्वाधिक 18 तर अझमतुल्ला ओमारझाईने 16 धावा केल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT