Sourav Ganguly  esakal
क्रीडा

Sourav Ganguly : BCCI अध्यक्षपद गेलेल्या 'दादा'समोर आता तीन पर्याय

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूने लागून देखील सौरभ गांगुलीला बीसीसीआय अध्यक्षपद सोडावे लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. सौरभ गांगुलीची जागा आता 1983 च्या वर्ल्डकप विजतेच्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे घेणार आहेत. सौरभ गांगुली बीसीसीआयचा तीन वर्ष अध्यक्ष राहिला. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनुकूल लागला असताना देखील बीसीसीआयमधील इतर अधिकाऱ्यांनी सौरभ गांगुलीच्या दुसऱ्या टर्मला विरोध केला. त्यामुळे सौरभ गांगुलीला नाईलाजास्तव आपले पद सोडावे लागले. बीसीसीआयचे अध्यक्षपद गेल्यानंतर आता सौरभ गांगुली पुढे काय करणार याबाबत सर्व क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. जाणकारांच्या मते सौरभ गांगुलीसमोर तीन पर्याय उपलब्ध आहेत.

1 आयपीएल (IPL)

सौरभ गांगुलीला दिल्ली कॅपिटल्सने 2020 च्या 13 व्या आयपीएल हंगामात आपला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. तो संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगसोबत मिळून काम करत होता. बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर त्याने हे पद सोडले होते. सौरभ गांगुलीचे जिंदाल ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत जुने नाते आहे. पार्थ जिंदालसोबत गांगुलीचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे गांगुली पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स सोबत जोडला जाऊ शकतो.

2 राजकारण (Politics)

सौरभ गांगुलीला बीसीसीआय अध्यक्षपदासाठीच्या दुसऱ्या टर्मला विरोध झाल्यानंतर याचे पडसाद पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात देखील पडले होते. तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर सौरभ गांगुलीचा अपमान केल्याचा आरोप केला. दादा भाजपमध्ये गेला नाही म्हणून त्याला बीसीसीआय अध्यक्षपदाची दुसरी टर्म नाकारण्यात आली. सौरभ गांगुली आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे चांगले संबंध काही लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे सौरभ गांगुलीसाठी राजकारणात जाण्याचा पर्याय कायम खुला असणार आहे.

3 आयसीसी (ICC)

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की सौरभ गांगुली आयसीसी चेअरमन पदाची निवडणूक लढवू शकतो. मात्र याची शक्यता फार कमी दिसत आहे. आयसीसी चेअरमन पदासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल केला जाऊ शकतो. मात्र बीसीसीआयच्या दिल्लीतील बौठकीवेळी झालेला विरोध पाहता सौरभ गांगुलीला संधी मिळणे कठिण आहे. दरम्यान, मध्यंतरी सौरभ गांगुलीने आपले शैक्षणिक अॅप देखील लाँच केले होते. त्यामुळे सौरभ गांगुली आपल्या व्यावसायिक प्लॅन्सवर देखील काम करू शकतात. गांगुलीने एक रेस्तराँ देखील सुरू केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोने खरेदीच्या तयारीत आहात? तर आधी हे वाचाच! सोने आणि चांदीच्या दरात अजून घसरण होणार का? तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Supreme Court Orders Mamata Banerjee Government : सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का! ; २० लाख कर्मचाऱ्यांना २५ टक्के महागाई भत्ता द्यावा लागणार

लग्नाआधीच मृणाल ठाकूर गरोदर? अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Yeola Farmers Protest : कांद्याला हमीभाव द्या! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून 'रास्ता रोको'

Latest Marathi News Live Update : अबु सालेमला दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने प्रकरण फेटाळले

SCROLL FOR NEXT