Ambati Rayudu-kohli  Sakal
क्रीडा

Ambati Rayudu : आक्रमकता दाखवून आयपीएल जिंकता येत नाही; रायडूचा कोहलीवर निशाणा

शनिवारच्या सामन्यात बंगळूरचा चेन्नईवर विजय एवढीच घटना त्यात घडली नव्हती. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि त्याचा बंगळूर संघ विजयाच्या जल्लोषात मश्गुल झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : आयपीएलची ट्रॉफी आक्रमकपणा आणि विजयाच्या जल्लोषाने जिंकता येत नसते, तसेच चेन्नईला हरवले म्हणून आयपीएल विजेता होता येत नाही, त्यासाठी प्ले-ऑफमध्ये चांगला खेळ करावा लागतो, अशा तिखट शब्दांत अंबाती रायडूने अप्रत्यक्षपणे विराट कोहलीला सुनावले.

अंबाती रायडू हा चेन्नई संघाचा खेळाडू गतवर्षी आयपीएल वितेजेपदानंतर निवृत्त झाला. महेंद्रसिंग धोनीने करंडक स्वीकारायला गतवर्षी रायडूला मंचावर बोलावले होते इतका त्याचा सन्मान राखण्यात आला होता, गेल्या शनिवारी बंगळूर संघाकडून झालेला पराभव आणि त्यानंतर विराट कोहलीचे अतिउत्साहातील सेलिब्रेशन रायडूला पचनी पडले नव्हते. शुक्रवारी बंगळूरचा राजस्थान संघाकडून पराभव झाल्यानंतर रायडूच्याही भावनांचा उद्रेक झाला.

शनिवारच्या सामन्यात बंगळूरचा चेन्नईवर विजय एवढीच घटना त्यात घडली नव्हती. सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि त्याचा बंगळूर संघ विजयाच्या जल्लोषात मश्गुल झाला होता. खेळाडूंच्या हस्तांदोलनासाठी धोनी आपली टीम घेऊन आला, तो सर्वात पुढे होता; परंतु बंगळूरचे खेळाडू जल्लेषातच मग्न होते, परिणामी धोनी कोणाशीही हस्तांदोलन न करता माघारी फिरला होता. आता समालोचन करत असलेल्या रायडूच्या नजतेतून हा प्रसंग सुटला नव्हता, म्हणूनच काल बुधवारी बंगळूरचा संघ पराभूत झाल्यानंतर त्याने प्रामुख्याने विराट कोहलीवर निशाणा साधला.

आम्ही अपेक्षेपेक्षा कमी धावा केल्या, अशी कबुली बंगळूरचा कर्णधार फाफ डुप्लेसीने सामन्यानंतर दिली. तसेच पराभवास इतरही काही बाबी महत्त्वाच्या ठरल्या. आमच्याकडून झालेल्या काही चुकांचा फायदा राजस्थानला धावांचा पाठलाग करताना मिळाला. तरीही बंगळूर संघाचा मला अभिमान आहे, असे डुप्लेसीने सांगितले.

रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात दव पडणार असल्याने आम्हाला आणखी २० धावा करायला हव्या होत्या. दव आणि इम्पॅक्ट खेळाडू असे घटक मारक ठरले. हेटमायर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आला आणि त्याने केलेली फटकेबाजी आम्हाला विजयापासून दूर नेणारी ठरली, असे डुप्लेसी म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT